Homeमाय व्हॉईसअक्षता मॅडमनी हायजॅक...

अक्षता मॅडमनी हायजॅक केली मनसेची फेरीवाला हटाव मोहीम!

गेल्या आठवड्यापासून मुंबईतल्या दादर रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील परिसराला झाले तरी काय? असा प्रश्न विचारावा लागत आहे. अगदी फिरत्या रंगमंचाप्रमाणे काहीतरी मेजर घडल्याचे जाणवत होते. तुमची उस्तुकता फार ताणत नाही. अहो मीपण चाटच पडलो. दादर स्थानक आणि बाहेरच्या परिसरात चक्क फेरीवाले नाहीत…. मलाच जरा गरगरल्यासारखे झाले. मनात आले आपण रेल्वेस्थानक तर चुकलो नाही ना? बरोबरच्या प्रवाशाला मला चिमटा काढायला सांगितलं. त्याने तो इतका मोठा काढला की मी ओरडल्याने आसपासची माणसे बघायला लागली. वाचकहो कारणही तसेच होते. दादर रेल्वेस्थानक (प.) परिसरात फेरीवालेच दिसत नव्हते. एरव्ही दादरचे रस्ते दिसण्याऐवजी दूरवर नजर गेली तरी फेरीवालेच दृष्टीला पडत. पण गेल्या बुधवारपासून मात्र हाच का तो दादर परिसर असे विचारण्याइतपत फेरीवाल्यांचे उच्चाटन झालेले दिसले. हा दादर परिसर स्वच्छ करण्याचे सर्व श्रेय अक्षता तेंडुलकर या भारतीय जनता पार्टीच्या महिला पदाधिकाऱ्याला जाते, हे आवर्जून सांगितले पाहिजे. नाहीतर दादर हा शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बालेकिल्ला. नवनिर्माण सेनेने तर फेरीवाले हटाव ही मोहीमच हाती घेतलेली होती. इतर सर्व धोरणाप्रमाणे हेही मनसेचे धोरण अर्धवटच राहिले हे आपण सर्वजण जाणून आहातच!!

असो… आता ही जादूची कांडी कशी फिरली याचा जरा आँखो देखा प्रसंगच अनुभवूया. काय झाले की गेल्या सुमारे सहा-सात महिन्यांपासून दादरमधील मुस्लिम फेरीवाल्यांची संख्या हळूहळू वाढत चाललेली होती. खरेतर फेरीवाले वाढले आहेत हे कळतच नाही. कारण केव्हाही गेले तरी दादरचे रस्ते गच्च भरलेलेच असतात. सुमारे तीन महिन्यांपासून मराठी फेरीवाल्यांच्या लक्षात एक गोष्ट येऊ लागली होती. ती म्हणजे मराठी फेरीवाल्यांना मोठा दंड होऊ लागला होता. त्या तुलनेत मुस्लिमांना कोणी काही विचारतच नव्हते. मुंबई महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने फेरीवाल्यांचा माल पकडला की थेट वडाळ्याच्या चौकीवर नेत असत. तेथे रीतसर दंड भरून फेरीवाले आपला माल परत मिळवीत. गेल्या काही महिन्यांपासून यातही काळीकांडी करण्यास हितसंबंधियानी सुरुवात केली होती. मराठी माणसांना दंड आणि मुस्लिम फेरीवाल्यांना त्यांचा माल दंड न भरताच परत मिळत असे.

तेथे कोणी शमसुद्दिन आणि जमाल नामक दलालांशी संपर्क साधल्यास महापालिकेचा मुकादम मुस्लिमांचा माल दंड न घेताच परत देत असे. मराठी मुलांनी प्रथम प्रथम पालिका अधिकाऱ्यांना सांगून पाहिले. परंतु परिणाम शून्य… नंतर मराठी कार्ड वापरणाऱ्या राजकीय नेत्यांनाही विनवणी केली. तात्पुरता दिलासा मिळत असे, मात्र तरीही त्रास काही थांबण्याचे नाव घेईना. तेव्हा मात्र सर्वांनी अक्षता मॅडमकडे धाव घेतली. मग या रणरागिणीने थेट वडाळा चौकीवरच चाल करून गेल्या. तेथे सुमारे तासभर धुमश्चक्री झाली. अनासायास तेथे अक्षता यांना शमसुद्दिन हा दलाल हाती लागला. मग काय शमसुद्दिनच्या कॉलरलाच हात घातला गेला. खरेतर शमसुद्दिनचे तेथे काही कामच नव्हते. ना तो फेरीवाला होता, ना पालिकेचा माणूस… जर हा कोणीच नाही तर मग हा येथे कसा? असा आवाज चढवून त्यांनी विचारले. त्यांच्याबरोबरच्या एक-दोन कार्यकर्त्यांनी कानाखाली आवाजही काढले.

झाले… इतके सर्व झाल्याने गेल्या आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात फेरीवाले गायब झाले आहेत. असाच मोकळा श्वास दादरवासियांच्या नेहमीच नशिबी यावा अशी सर्वांचीच मागणी आहे. दरम्यानच्या काळात दादर भागात बांगलादेशीय मुस्लिमांची ये-जा होत असल्याची तक्रार अक्षता तेंडुलकर यांनी बोलताना केली. कबुतरखाना परिसरातील एका मशिदीत अवैध धंदे सुरू असल्याची तक्रारही त्यांनी केली. मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेने याप्रकरणी चौकशी करावी या मागणीने जोर घेतलेला आहे. जाता जाता एक माहिती हाती आली आहे की पूर्वीच्या गुंड टोळ्याशी संबंध असलेल्या अरुण दरेकर नामक व्यक्ती बरीच मोठी रक्कम घेऊन दादर परिसरात अनेक मुस्लिमांना आणत असल्याचे समजले. छबिलदासच्या गल्लीत ही व्यक्ती खुलेआम फिरत असल्याचे तेथे फेरफटका मारला असता समजले. आता अक्षता मॅडममुळे या परिसरात निर्माण झालेली शांतता किती काळ टिकते हे पाहायचे…

Continue reading

माध्यमांना ठाकरेंच्या शिवसेनेचे का बरे वावडे?

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आज दाकल झाले. या प्रक्रियेत गेल्या चार दिवसांपासून विविध मराठी वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत एक सवाल विचारला गेला- उबाठाचे प्रवक्ते पत्रकारांना वा वृत्तवाहिन्यांना उपलब्ध का नसतात? त्याबाबत निरीक्षणातून हाती आलेली...

‘केइएम’मध्ये मदत कक्षालाच हवी मदत! तपासायला डॉक्टर मिळाला तर उत्तमच!!

मुंबई महापालिकेच्या प्रमुख समजल्या जाणाऱ्या केइएम रुग्णालयात डॉक्टरांसहित कर्मचारी-कामगारांमध्ये सुमारे २० टक्के इतकी मोठी कपात करण्यात आली असून मोडकळीस आलेले स्ट्रेचर्स वगैरे सामान गोदमात ढकलून देण्यासाठीही कामगार नसल्याची संतापजनक माहिती हाती आली आहे. अपघात विभागातील डॉक्टरांची संख्या तर एक-दोन...

मुंबई बॉम्बस्फोटांचे मास्टरमाईंड अंमली पदार्थांच्या फॅक्टरीमागे?

मुंबईच्या आग्रीपाडा पोलीसठाण्याच्या समोरच्या बाजूसच असलेल्या घास गल्लीतील अमली पदार्थांचा कारखाना नार्कोटिक्स विभागाने उद्ध्वस्त केल्यानंतर गेले सुमारे पाच-सहा दिवस दक्षिणमध्य मुंबईतील अनेक भागांना भेटी दिल्यानंतर एक गोष्ट हळूहळू स्पष्ट होत आहे की, या अमली पदार्थांच्या व्यापार व कारखान्यांमागे मुंबईत...
Skip to content