Homeटॉप स्टोरीअजित पवार नवे...

अजित पवार नवे वित्त मंत्री तर फडणवीसांकडेच गृह खाते!

राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्येदेखील काही फेरबदल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले.

मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग ठेवण्यात आले आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधि व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन हे खाते राहील.

खाते

इतर २६ मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे: 

छगन भुजबळ अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण.

दिलीप वळसे-पाटील सहकार.  

राधाकृष्ण विखे-पाटील महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास.

सुधीर मुनगंटीवार वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय.

हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य.

चंद्रकांत पाटील उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य.

विजयकुमार गावित आदिवासी विकास.

गिरीष महाजन ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन.

गुलाबराव पाटील पाणीपुरवठा व स्वच्छता.

दादाजी भुसे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम).

संजय राठोड मृद व जलसंधारण.

धनंजय मुंडे कृषि.

सुरेश खाडे कामगार.

संदीपान भुमरे रोजगार हमी योजना व फलोत्पादन.

उदय सामंत उद्योग.

प्रा. तानाजी सावंत सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण.

रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून).

अब्दुल सत्तार– अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन.

दीपक केसरकर शालेय शिक्षण व मराठी भाषा.

धर्मरावबाबा आत्राम अन्न व औषध प्रशासन.

अतुल सावे गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण.

शंभूराज देसाई राज्य उत्पादन शुल्क.

अदिती तटकरे महिला व बालविकास.

संजय बनसोडे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे.

मंगलप्रभात लोढा कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता.

अनिल पाटील मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन.

अजित पवार यांच्याकडून कामकाजाला सुरुवात

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राज्याच्या वित्त व नियोजन विभागाच्या मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तत्पूर्वी सकाळी त्यांनी दोन्ही विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंत्रालयात बैठक घेऊन वित्त व नियोजन विभागाच्या सद्यस्थितीची माहिती तसेच कामकाजाचा आढावा घेतला. अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, अतिरिक्त मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता यावेळी उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी आज मंत्रालयातील त्यांच्या दालनातून कामकाजाला सुरुवात केली. वित्त व नियोजन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर ते अभ्यागत नागरिकांना भेटले. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांचे कार्यालय मंत्रालयातील पाचव्या मजल्यावरील 503 क्रमांकाच्या दालनात असून या दालनातूनच ते आपल्या विभागांचे तसेच उपमुख्यमंत्रीपदाचे कामकाज पाहणार आहेत.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content