HomeArchiveउदयनराजे, हर्षवर्धन, गणेश...

उदयनराजे, हर्षवर्धन, गणेश नाईक आणि भास्करराव, एक वर्तुळ पूर्ण!

Details
“उदयनराजे, हर्षवर्धन, गणेश नाईक आणि भास्करराव, एक वर्तुळ पूर्ण!”

    16-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

 
 
 
योगेश वसंत त्रिवेदी
yogeshtrivedi55@gmail.com
 
 
 
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय जनता पक्षप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला २०१४पेक्षाही घवघवीत यश मिळाले. मोदी सरकार-२ अस्तित्त्वात आले. या सरकारने केवळ शंभर दिवसात जी नेत्रदीपक कामगिरी बजावली आणि जम्मू-काश्मीर तसेच लडाखला केंद्रशासित प्रदेश बनवितानाच जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे भारतीय संविधानातील ३७०वे कलम रद्द करण्याची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात खणखणीत आणि दणदणीतपणे मांडली. पं. जवाहरलाल नेहरू यांच्या काळातील मोठी चूक ७० वर्षानंतर मोदी आणि शाह यांच्या जबरदस्त नेतृत्त्वाखालील भाजपप्रणित रालोआ सरकारने धाडसाने दुरूस्त करून नवा इतिहास घडविला. मोदी आणि शाह यांच्या या ऐतिहासिक आणि क्रांतिकारक भूमिकेचे सर्वच राष्ट्रप्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीप्रमाणे कुंपणावर बसणे पसंत केले. पं. नेहरू यांनी केलेल्या चुकीचे परिमार्जन करण्याची संधी सोनिया आणि राहुल गांधी यांना चालून आली होती. परंतु, पंडितजींच्या आंधळ्या प्रेमाची पट्टी सोनिया, राहुल यांच्या डोळ्यांवर असल्याने गांधारी बनण्याची भूमिका युपीएच्या चेअरपर्सनना वठवावी लागली. परंतु, राजा हरिसिंहपुत्र करणसिंह, शशी थरूर, जनार्दन द्विवेदी यांच्यासह अनेक महत्त्वाच्या काँग्रेस नेत्यांनी मोदी सरकारच्या ३७० कलम रद्द करण्याच्या भूमिकेचे समर्थन केले. राष्ट्रवादीच्या खासदार उदयनराजे भोसले, माजी उपमुख्यमंत्री आणि शरदरावांचे पुतणे अजित पवार यांच्यासह अनेकांनी मोदी सरकारच्या भूमिकेला पाठिंबा दिला.
 
 
मोदी सरकारचा करिष्मा फैलावू लागला आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला प्रारंभ होऊ लागला. तसे भाजप आणि शिवसेनेकडे येणाऱ्या नेत्यांचा ओघही वाढू लागला. २०१४पासूनच तशी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांना ओहोटी/गळती लागली होती. ती ओहोटी पुढेही सुरू राहणे हे ओघाने आलेच. पण शरद पवार आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना जो जबरदस्त फटका बसला त्याची या दोन्ही पक्षांच्या नेतृत्त्व करणाऱ्या दिग्गज नेत्यांनी कधी कल्पनाच केलेली नसेल. एका अर्थाने जे दिग्गज नेते आज भाजप आणि सेनेत येत आहेत त्यांच्या महायुतीच्या प्रवेशाने या नेत्यांनी एक वर्तुळ पूर्ण केले आहे असेच म्हणावे लागेल. शनिवार, १४ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नवी दिल्ली येथे भाजपचे अध्यक्ष अमित शाह, कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, रामदास आठवले, रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. तत्पूर्वी उदयनराजे भोसले यांनी आपल्या सातारा लोकसभा सदस्यत्वाचे त्यागपत्र लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सुपूर्द केले. सध्या महाराष्ट्रात शिवशाही-दोन सरकार कार्यरत असून शिवशाही-तीनच्या स्वागतासाठी औपचारिकता शिल्लक आहे. मनोहर जोशी यांच्या नेतृत्त्वाखाली शिवशाही-एक सरकार १४ मार्च १९९५ रोजी अधिकारारूढ झाले. १९९९ साली असुरी महत्त्वाकांक्षा आणि फाजील आत्मविश्वास, यामुळे दोन्ही काँग्रेसच्या हाती सत्ता गेली. परंतु शिवशाही-एकच्या कार्यकाळात छ. उदयनराजे भोसले, गणेश नाईक, राधाकृष्ण विखे पाटील, भास्कर जाधव अशी नेतेमंडळी सरकारमध्ये किंवा सरकारी उपक्रमांमध्ये सहभागी होती. उदयनराजे महसूल राज्यमंत्री होते. राधाकृष्ण विखे पाटील कृषिमंत्री होते, गणेश नाईक वन आणि पर्यावरण मंत्री होते, भास्कर जाधव यांनी झुंझार आमदार म्हणून भूमिका निभावली होती. विशेष म्हणजे शिवशाही-एक हे सरकार सेना, भाजप आणि ४५ अपक्ष आमदारांच्या सहकार्याने सत्तारूढ झाले होते.
 
 

 
 
 
आज शिवशाही-दोनच्या अखेरीस आणि शिवशाही-तीनची चाहूल लागताना सातारचे राजे उदयनराजे भोसले, गणेश नाईक आणि डॉ. संजीव नाईक हे पितापुत्र, हर्षवर्धन पाटील यांनी भाजपचे कमळ हाती घेतले तर भास्कर जाधव यांनी पुनश्च हरी ओम करीत जुने ‘गिले शिकवे’ दूर करून मातोश्रीवर शिवबंधन हाती बांधले. उदयनराजे भोसले, गणेश नाईक आणि भास्कर जाधव यांनी शरद पवार यांच्या पक्षाला रामराम ठोकला तर शरद पवार यांच्या राजकारणावर घणाघाती प्रहार करीत हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसच्या ‘हाता’ला सोडचिठ्ठी देत भाजपचे नेतृत्त्व स्वीकारले. हर्षवर्धन पाटीलसुद्धा शिवशाही-एकमध्ये राज्यमंत्री होते आणि १९९५ साली पवार विरोधकांची फौज विलासराव देशमुख आणि सुधाकरराव नाईक यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या माध्यमातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे पाठविली होती. त्या फौजेचे अग्रणी होते शंकरराव पाटील यांचे पुतणे हर्षवर्धन पाटील. हर्षवर्धन पाटील, डॉ. विजयकुमार गावित, अशोक पाटील डोणगावकर, अनिल देशमुख हे अपक्ष आमदार शिवशाही-एकमध्ये राज्यमंत्री होते. मध्यंतरी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात नितीन गडकरी यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असताना राजकीय टोलेबाजी केली होती. हर्षवर्धन पाटील हे संसदीय कार्यमंत्री होते आणि मिश्किलपणे भाषणात गडकरी यांनी कोपरखळी मारली. हर्षवर्धन पाटील यांच्याकडे पाहत ते म्हणाले होते की, तुयचं काय बाबा, उद्या आमचंच सरकार आल्यावर तुम्ही आमच्या सरकारमध्ये मंत्री असाल. कालचक्र कसं फिरतं पाहा. आज नितीन गडकरी यांनी काढलेले उद्गार खरे ठरताहेत. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी शुक्रवारी फलटणमध्ये समर्थक कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन तूर्तास तरी राष्ट्रवादीमध्ये राहणार असल्याचे सांगितले. पण, उद्याचे सांगता येत नाही असेही स्पष्ट केले. शरद पवार यांच्या या वयात त्यांची साथ सोडणे जीवावर येत असल्याचे सांगितले. अर्थात, त्यांच्या चिरंजीवांच्या राजकीय भवितव्यासाठी ते उद्या त्याला शिवबंधन बांधून पुढे मार्गक्रमण करायला लावू शकतील, अशी चर्चा आहे. शिवशाही-एकच्या काळात रामराजे कृष्णा खोरे महामंडळाचे नेतृत्त्व करीत होते.
 
 
या सर्वच राजकीय घडामोडी पाहता या तमाम नेत्यांनी एक वर्तुळ पूर्ण केल्याचे किंबहुना करीत असल्याचे म्हणावे लागेल. आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप व सेना तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, शिवसंग्राम, राष्ट्रीय समाज पक्ष, रयत क्रांतिकारी संघटना, जनसुराज्य पक्ष अशा मित्रपक्षांच्या महायुतीचे सरकार पुनःश्च अधिकारारूढ व्हावे म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे सामंजस्याने एकेक पाऊल टाकत आहेत. त्यांना त्यांचे सहकारी सक्रीय साथ देत आहेत. हम तो आगे चले गये और कारवाँ बढता गया, या न्यायाने उदयनराजे भोसले, गणेश नाईक, हर्षवर्धन पाटील, भास्कर जाधव आणि असंख्य नेते महायुतीच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांच्या सूत्रानुसार ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ याप्रमाणे आगेकूच करावी. मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेच्या अनुषंगाने “”निवडणूक ही तर आता एक औपचारिकता शिल्लक आहे. महाराष्ट्रातील जनतेने आदेश (जनादेश) दिलेलाच आहे”” असे सांगितले आहे. असे असले तरी शत्रू दबा धरून बसला आहे असे समजून गाफिल न राहता, डोळ्यात तेल घालून, कंबर कसून निवडणुकीच्या रणांगणावर उतरावे. सत्तेची वरमाला आपल्या गळ्यात घालण्यासाठी उभी आहे. एकमेकांची उणीदुणी न काढता सहकार्य, समन्वय, सौहार्द आणि सामंजस्य या चतुःसूत्रीनुसार कार्य करावे. शिवशाही-तीनच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेला ‘अच्छे दिन’ दाखवावेत. बिनकामाच्या तलवारी उपसल्याशिवाय मित्रपक्षांना सोबत घेऊन वाटचाल करावी, हा मोठा तो मोठा, या भ्रामक कल्पनांच्या मागे न धावता खांद्याला खांदा लावून काम करावे, अशीच जनतेची अपेक्षा आहे. विरोधी पक्ष चाचपडतोय. त्याला चाचपडू द्या, मोदी आणि फडणवीस सरकारने केलेल्या ऐतिहासिक आणि क्रांतिकारक कामांची शिदोरी मोठी आहे. त्या जोरावर सत्ता सहजपणे टिकविता येईल. ती टिकविण्यासाठी प्रयत्न करा. बाकी लई मागनं न्हाई!
 ”

 

 
 
 
योगेश वसंत त्रिवेदी
yogeshtrivedi55@gmail.com
 
 
 
“महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय जनता पक्षप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला २०१४पेक्षाही घवघवीत यश मिळाले. मोदी सरकार-२ अस्तित्त्वात आले. या सरकारने केवळ शंभर दिवसात जी नेत्रदीपक कामगिरी बजावली आणि जम्मू-काश्मीर तसेच लडाखला केंद्रशासित प्रदेश बनवितानाच जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे भारतीय संविधानातील ३७०वे कलम रद्द करण्याची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात खणखणीत आणि दणदणीतपणे मांडली. पं. जवाहरलाल नेहरू यांच्या काळातील मोठी चूक ७० वर्षानंतर मोदी आणि शाह यांच्या जबरदस्त नेतृत्त्वाखालील भाजपप्रणित रालोआ सरकारने धाडसाने दुरूस्त करून नवा इतिहास घडविला. मोदी आणि शाह यांच्या या ऐतिहासिक आणि क्रांतिकारक भूमिकेचे सर्वच राष्ट्रप्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीप्रमाणे कुंपणावर बसणे पसंत केले. पं. नेहरू यांनी केलेल्या चुकीचे परिमार्जन करण्याची संधी सोनिया आणि राहुल गांधी यांना चालून आली होती. परंतु, पंडितजींच्या आंधळ्या प्रेमाची पट्टी सोनिया, राहुल यांच्या डोळ्यांवर असल्याने गांधारी बनण्याची भूमिका युपीएच्या चेअरपर्सनना वठवावी लागली. परंतु, राजा हरिसिंहपुत्र करणसिंह, शशी थरूर, जनार्दन द्विवेदी यांच्यासह अनेक महत्त्वाच्या काँग्रेस नेत्यांनी मोदी सरकारच्या ३७० कलम रद्द करण्याच्या भूमिकेचे समर्थन केले. राष्ट्रवादीच्या खासदार उदयनराजे भोसले, माजी उपमुख्यमंत्री आणि शरदरावांचे पुतणे अजित पवार यांच्यासह अनेकांनी मोदी सरकारच्या भूमिकेला पाठिंबा दिला.”
 
 
“मोदी सरकारचा करिष्मा फैलावू लागला आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला प्रारंभ होऊ लागला. तसे भाजप आणि शिवसेनेकडे येणाऱ्या नेत्यांचा ओघही वाढू लागला. २०१४पासूनच तशी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांना ओहोटी/गळती लागली होती. ती ओहोटी पुढेही सुरू राहणे हे ओघाने आलेच. पण शरद पवार आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना जो जबरदस्त फटका बसला त्याची या दोन्ही पक्षांच्या नेतृत्त्व करणाऱ्या दिग्गज नेत्यांनी कधी कल्पनाच केलेली नसेल. एका अर्थाने जे दिग्गज नेते आज भाजप आणि सेनेत येत आहेत त्यांच्या महायुतीच्या प्रवेशाने या नेत्यांनी एक वर्तुळ पूर्ण केले आहे असेच म्हणावे लागेल. शनिवार, १४ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नवी दिल्ली येथे भाजपचे अध्यक्ष अमित शाह, कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, रामदास आठवले, रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. तत्पूर्वी उदयनराजे भोसले यांनी आपल्या सातारा लोकसभा सदस्यत्वाचे त्यागपत्र लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सुपूर्द केले. सध्या महाराष्ट्रात शिवशाही-दोन सरकार कार्यरत असून शिवशाही-तीनच्या स्वागतासाठी औपचारिकता शिल्लक आहे. मनोहर जोशी यांच्या नेतृत्त्वाखाली शिवशाही-एक सरकार १४ मार्च १९९५ रोजी अधिकारारूढ झाले. १९९९ साली असुरी महत्त्वाकांक्षा आणि फाजील आत्मविश्वास, यामुळे दोन्ही काँग्रेसच्या हाती सत्ता गेली. परंतु शिवशाही-एकच्या कार्यकाळात छ. उदयनराजे भोसले, गणेश नाईक, राधाकृष्ण विखे पाटील, भास्कर जाधव अशी नेतेमंडळी सरकारमध्ये किंवा सरकारी उपक्रमांमध्ये सहभागी होती. उदयनराजे महसूल राज्यमंत्री होते. राधाकृष्ण विखे पाटील कृषिमंत्री होते, गणेश नाईक वन आणि पर्यावरण मंत्री होते, भास्कर जाधव यांनी झुंझार आमदार म्हणून भूमिका निभावली होती. विशेष म्हणजे शिवशाही-एक हे सरकार सेना, भाजप आणि ४५ अपक्ष आमदारांच्या सहकार्याने सत्तारूढ झाले होते.”
 
 

 
 
 
“आज शिवशाही-दोनच्या अखेरीस आणि शिवशाही-तीनची चाहूल लागताना सातारचे राजे उदयनराजे भोसले, गणेश नाईक आणि डॉ. संजीव नाईक हे पितापुत्र, हर्षवर्धन पाटील यांनी भाजपचे कमळ हाती घेतले तर भास्कर जाधव यांनी पुनश्च हरी ओम करीत जुने ‘गिले शिकवे’ दूर करून मातोश्रीवर शिवबंधन हाती बांधले. उदयनराजे भोसले, गणेश नाईक आणि भास्कर जाधव यांनी शरद पवार यांच्या पक्षाला रामराम ठोकला तर शरद पवार यांच्या राजकारणावर घणाघाती प्रहार करीत हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसच्या ‘हाता’ला सोडचिठ्ठी देत भाजपचे नेतृत्त्व स्वीकारले. हर्षवर्धन पाटीलसुद्धा शिवशाही-एकमध्ये राज्यमंत्री होते आणि १९९५ साली पवार विरोधकांची फौज विलासराव देशमुख आणि सुधाकरराव नाईक यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या माध्यमातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे पाठविली होती. त्या फौजेचे अग्रणी होते शंकरराव पाटील यांचे पुतणे हर्षवर्धन पाटील. हर्षवर्धन पाटील, डॉ. विजयकुमार गावित, अशोक पाटील डोणगावकर, अनिल देशमुख हे अपक्ष आमदार शिवशाही-एकमध्ये राज्यमंत्री होते. मध्यंतरी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात नितीन गडकरी यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असताना राजकीय टोलेबाजी केली होती. हर्षवर्धन पाटील हे संसदीय कार्यमंत्री होते आणि मिश्किलपणे भाषणात गडकरी यांनी कोपरखळी मारली. हर्षवर्धन पाटील यांच्याकडे पाहत ते म्हणाले होते की, तुयचं काय बाबा, उद्या आमचंच सरकार आल्यावर तुम्ही आमच्या सरकारमध्ये मंत्री असाल. कालचक्र कसं फिरतं पाहा. आज नितीन गडकरी यांनी काढलेले उद्गार खरे ठरताहेत. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी शुक्रवारी फलटणमध्ये समर्थक कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन तूर्तास तरी राष्ट्रवादीमध्ये राहणार असल्याचे सांगितले. पण, उद्याचे सांगता येत नाही असेही स्पष्ट केले. शरद पवार यांच्या या वयात त्यांची साथ सोडणे जीवावर येत असल्याचे सांगितले. अर्थात, त्यांच्या चिरंजीवांच्या राजकीय भवितव्यासाठी ते उद्या त्याला शिवबंधन बांधून पुढे मार्गक्रमण करायला लावू शकतील, अशी चर्चा आहे. शिवशाही-एकच्या काळात रामराजे कृष्णा खोरे महामंडळाचे नेतृत्त्व करीत होते.”
 
 
“या सर्वच राजकीय घडामोडी पाहता या तमाम नेत्यांनी एक वर्तुळ पूर्ण केल्याचे किंबहुना करीत असल्याचे म्हणावे लागेल. आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप व सेना तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, शिवसंग्राम, राष्ट्रीय समाज पक्ष, रयत क्रांतिकारी संघटना, जनसुराज्य पक्ष अशा मित्रपक्षांच्या महायुतीचे सरकार पुनःश्च अधिकारारूढ व्हावे म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे सामंजस्याने एकेक पाऊल टाकत आहेत. त्यांना त्यांचे सहकारी सक्रीय साथ देत आहेत. हम तो आगे चले गये और कारवाँ बढता गया, या न्यायाने उदयनराजे भोसले, गणेश नाईक, हर्षवर्धन पाटील, भास्कर जाधव आणि असंख्य नेते महायुतीच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांच्या सूत्रानुसार ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ याप्रमाणे आगेकूच करावी. मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेच्या अनुषंगाने “”निवडणूक ही तर आता एक औपचारिकता शिल्लक आहे. महाराष्ट्रातील जनतेने आदेश (जनादेश) दिलेलाच आहे”” असे सांगितले आहे. असे असले तरी शत्रू दबा धरून बसला आहे असे समजून गाफिल न राहता, डोळ्यात तेल घालून, कंबर कसून निवडणुकीच्या रणांगणावर उतरावे. सत्तेची वरमाला आपल्या गळ्यात घालण्यासाठी उभी आहे. एकमेकांची उणीदुणी न काढता सहकार्य, समन्वय, सौहार्द आणि सामंजस्य या चतुःसूत्रीनुसार कार्य करावे. शिवशाही-तीनच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेला ‘अच्छे दिन’ दाखवावेत. बिनकामाच्या तलवारी उपसल्याशिवाय मित्रपक्षांना सोबत घेऊन वाटचाल करावी, हा मोठा तो मोठा, या भ्रामक कल्पनांच्या मागे न धावता खांद्याला खांदा लावून काम करावे, अशीच जनतेची अपेक्षा आहे. विरोधी पक्ष चाचपडतोय. त्याला चाचपडू द्या, मोदी आणि फडणवीस सरकारने केलेल्या ऐतिहासिक आणि क्रांतिकारक कामांची शिदोरी मोठी आहे. त्या जोरावर सत्ता सहजपणे टिकविता येईल. ती टिकविण्यासाठी प्रयत्न करा. बाकी लई मागनं न्हाई!”

 

Continue reading

बारामतीतला अजितदादांचा उत्तराधिकारी नसणार बिनविरोध?

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागांवर आता राजकीय रणधुमाळी उडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपने विशेषतः बारामतीची निवडणूक 'बिनविरोध' करण्यासाठी आवाहन केले असतानाच, काँग्रेसने राहुरी आणि बारामती या दोन्ही जागा...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर ‘मनाचे श्लोक’चा प्रभाव?

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये दररोज सकाळच्या परिपाठात समर्थ रामदास स्वामींचे 'मनाचे श्लोक' म्हणणे सक्तीचे करावे, असा प्रस्ताव मुंबई महापालिकेतल्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी मांडला आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या बालमनावर चांगले संस्कार घडवण्यासाठी हा प्रस्ताव आहे, असे पेडणेकर यांचे म्हणणे आहे....

विमानप्रवास महागला! कृषी क्षेत्रालाही फटका!! निर्यात रोडावणार!!!

पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावपूर्ण युद्धस्थितीचा थेट परिणाम आता सामान्य प्रवाशांच्या खिशावर दिसू लागला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने विमान इंधन (एटीएफ) दरात मोठी उसळी आली असून, त्याचा परिणाम म्हणून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान तिकिटांचे दर लक्षणीयरीत्या...
Skip to content