Homeब्लॅक अँड व्हाईटतुम्हीच सांगा, दादर...

तुम्हीच सांगा, दादर मोकळं झालं.. असं म्हणू तरी कसं?

मुंबईच्या दादर (प.) रेल्वेस्थानकाबाहेरील काही पदपथ महापालिका आणि पोलिसांनी काही प्रमाणात साफ केल्याचे कालच संध्याकाळी दिसून आले. पण काहीच पदपथ हे लक्षात घेतले पाहिजे. तेथे रात्री उशिरापर्यंत एक मोठी गाडीही उभी असते. पण त्याचा इच्छित परिणाम मात्र काहीच दिसून आला नाही. कारण स्थानकाजवळील फेरीवाले गेले असतीलही. पण रानडे रोडवर दहा पावले चालल्यावर आदर्श हॉटेलपर्यंत जेमतेम आलो की फेरीवाले पुन्हा दिसू लागतात. छबीलदासच्या गल्लीतील बॅगवालेही संध्याकाळी पाच कधी वाजतात, याची वाट पाहत असतात!

नवीनच डोकेदुखी

‘सुविधा’च्या आगेमागे त्या कॉर्नरला खाऊची बरीच दुकाने / ज्यूसवाले झाल्याने त्यांची सर्व गिऱ्हाइके पदपथावर नागरिकांचा रस्ता अडवूनच ज्यूसपान करत असतात. तीच गोष्ट छबीलदास रोडवर प्रवेश करताना एका चाटवाल्याने रस्त्यावरच सर्व्ह करण्याचे ठरवल्याने तेथेही पदपथ अडला जातोच. त्यांना सांगितले की, जरा जाऊ देता का? तर तो मालक व खाणाराही ‘काय राव तुम्ही इथेच कुठे आलात? आम्हाला खाऊ दे की वाईच! असं ऐकवतात. संतापाची बाब म्हणजे समोरच उभी असलेली पोलिसांची व्हॅन हे सर्व पाहत असते. पण खाली उतरून पदपथ

मोकळा करून देण्याचे मात्र कुणालाही सुचत नाही! आदर्शला जी फेरीवाल्यांची लाईन सुरु होते ती मेट्रो स्थानकापर्यंत संपत नाही. तेथे तर सिग्नलच्या आधी पदपथावर दोनतीन पक्के स्टॉल पदपथाच्या मध्येच नाकावर टिच्चून उभे आहेत. त्यांच्याकडे परवानगी असली तरी नवीन आदेशामुळे त्यांना तिथून हटवून त्यांचे पुनर्वसन केले जावे, अशी नागरिकांची मागणी आहे. या स्टॉल्सनीही आपले हातपाय नको इतके पसरलेले आहेत असे समजते.

फुल बाजारासमोरही लक्ष द्या

रानडे रोडची अशी हालत आहे. तर त्याला पुढे लागून असलेल्या फुल बाजारासमोरील रस्त्याची हालत काही वेगळी नाही. या कॉर्नरला उभे राहणे म्हणजे जणू ‘पाप’च. तरी बरे येथे बसस्टॉप असल्याने त्या प्रमाणात (आपणच आपली समजूत काढायची) गाड्या कमी. परंतु बाईकस्वार व स्कूटरवाल्यांचा त्रासच त्रास. नागरिक चालत आहेत. पुढे ही गर्दी आहे तरीही हे अतिशहाणे हॉर्न वाजवून कानांना त्रास देत असतातच. शेअर टॅक्सीवालेही कधीकधी टॅक्सी घुसवतात. टॅक्सी थांब्यावरून तुम्हाला कधी टॅक्सीवाल्याने लगेचच स्वीकारले तर त्या टॅक्सीवाल्याचा जाहीर सत्कार करा. गाड्या पार्क करण्यासाठी टॅक्सीवाले या थांब्याचा वापर करतात, असे नागरिक बोलतात. भांडी मार्केटचा पदपथ अजूनही मोकळा झालेला नाही. तेथे गजरेवाल्यानी बसकण मारलेलीच आहे. मग सांगा दादर मोकळं झालं.. असं म्हणू तरी कसं?

छायाचित्र मांडणी- प्रवीण वराडकर

(लेखक विजयकुमार काळे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

बिष्णोईच्या वकिलांनाही आता लागणार चाप! माध्यमेही रडारवर!!

ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस येथूनच लिहिताना केंद्रीय गृह मंत्रालय व गुप्तचरयंत्रणा गुंड लॉरेन्स बिष्णोई याच्या वाढत्या गुंड कारवायांना वैतागल्याचे विषद केले होते. अगदी त्याचप्रमाणे गेल्या पंधरा दिवसापासून गुजरातच्या साबरमती तुरुंगात असलेल्या बिष्णोईच्या भेटी घेणाऱ्या व्यक्तींना चाळण लावायला सुरुवात केली असून...

पूर्णेकर हत्त्येमागे भलताच अँगल?

ठाणे शहरातील उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे विभाग प्रमुख प्रदीप तथा बाळू पूर्णेकर यांच्या निर्घृण हत्त्येस एक महिना उलटून गेल्यानंतरही सूत्रधार मिळत नसल्याने ठाण्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय नाटक रंगत आहे, असे म्हटले तर वावगे होणार नाही. राजकीय नाटक, या...

बिष्णोई गँगच्या कारवायांमुळे दिल्लीतले अधिकारीही वैतागले!

आठ दिवसांपूर्वी रविवारी रात्री मुंबईत जुहूच्या पुष्पा पार्कजवळ प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफवर बिष्णोई गँगच्या गुंडांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबाराने मुंबई पोलीस सोडा, खुद्द केंद्रीय गृह मंत्रालयातील काही बडे अधिकारी संतापाने लालबुंद झाल्याची माहिती हाती आली आहे. खरंतर बिष्णोई गँगच्या कारवायांमुळे...
Skip to content