Homeडेली पल्सआज व उद्या...

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड इमारत, फोर्ट, मुंबई तसेच नागरी संरक्षण, क्रॉस मैदान येथील इमारतीवर बसविण्यात आलेल्या सायरनची चाचणी यावेळी घेण्यात येणार आहे.

या कालावधीत सायरनचा आवाज ऐकू आल्यास नागरिकांनी घाबरून जाऊ नये अथवा कोणताही गैरसमज करून घेऊ नये. सायरन वाजविण्याची प्रक्रिया ही केवळ प्रोटोटाइप सायरन उपकरणाच्या चाचणीचा भाग आहे. नागरिकांनी शांतता राखून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन अतिरिक्त नियंत्रक, नागरी संरक्षण, बृहन्मुंबई यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...

मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत केवल कुळकर्णी विजेता

मुंबईतल्या आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे एमएससी बँक पुरस्कृत मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत शेठ करमशी कानजी इंग्लिश स्कूलचा केवल कुळकर्णी विजेता ठरला. अटीतटीच्या अंतिम आठव्या फेरीत डावाच्या मध्यापर्यंत १०-० अशी आघाडी घेणाऱ्या उमैर पठाणला...

लहान मुलगा व गाईच्या नात्याची झलक पाहा ‘धाराऊ’मध्ये!

बुलढाणा अर्बन मीडिया हाऊस प्रस्तुत, मनिष सुरेश शिंदे दिग्दर्शित ‘धाराऊ’चा अधिकृत पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला असून या पोस्टरने या चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. ग्रामीण महाराष्ट्राची पार्श्वभूमी, मातीशी जोडलेली नाती आणि गोमातेबद्दलची श्रद्धा यांची भावस्पर्शी मांडणी करणाऱ्या ‘धाराऊ’ या मराठी...
Skip to content