Homeहेल्थ इज वेल्थनवरात्रीत महाराष्ट्रात होणार...

नवरात्रीत महाराष्ट्रात होणार आरोग्याचा जागर!

नवरात्रोत्सवात राज्यातील महाविद्यालयीन तरुणाईच्या आरोग्याचा जागर केला जाणार आहे. वाढता स्क्रीनटाइम, अपुरी झोप, चुकीच्या आहाराच्या सवयी, व्यायामाचा अभाव आणि मानसिक ताण यामुळे तरुणांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. या पार्श्वभूमीवर आजार टाळण्यासाठी तरुण वयापासूनच आरोग्यदायी जीवनशैलीबाबत जागृती व्हावी, यासाठी राज्यात प्रथमच ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ हा नऊ दिवसांचा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमातून राज्यातील विद्यापीठे आणि वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापक व वैद्यकीय तज्ज्ञ राज्यभरातील विद्यार्थ्यांशी थेट आरोग्यविषयक संवाद साधणार आहेत.

विद्यार्थ्यांशी थेट संवाद: राज्यातील वैद्यकीय, कृषी, अभियांत्रिकी, विज्ञान, वाणिज्य, कला आणि इतर विद्याशाखांतील विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होतील. प्रत्येक जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापक, विभागप्रमुख आणि वैद्यकीय तज्ज्ञ विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. तरुण वयात आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्यास त्याचे परिणाम पुढील आयुष्यात जाणवू शकतात. त्यामुळे आजार झाल्यानंतर उपचार घेण्याबरोबरच आजार टाळण्यासाठी योग्य आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, मानसिक आरोग्याची काळजी, व्यसनांपासून दूर राहणे आणि वेळेवर आरोग्य तपासणी यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले जाणार आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आरोग्याबाबत जागृत राहण्याबरोबरच ही माहिती कुटूंब, मित्र आणि समाजापर्यंत पोहोचवावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.

संवादाचे विषय:

  • बदलती जीवनशैली आणि तरुणांचे आरोग्य
  • संतुलित आहार आणि बदललेल्या आहाराच्या सवयी
  • व्यायाम आणि शारीरिक तंदुरुस्ती
  • मानसिक आरोग्य
  • मोबाईल, सोशल मीडिया आणि वाढता स्क्रीनटाइम
  • व्यसनांपासून दूर राहणे
  • निरोगी जीवनशैली आणि आरोग्यदायी समाजनिर्मिती

    ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ हा उपक्रम राज्यातील तरुणाईशी थेट संवाद साधणारा पहिलाच उपक्रम आहे. सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत तरुणांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांवर त्यांच्याशी थेट संवाद साधणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांना या संवादातून आरोग्याशी संबंधित प्रश्न मोकळेपणाने मांडता येणार आहेत. तज्ज्ञांकडून मिळणारी माहिती आरोग्यदायी जीवनशैलीकरिता विद्यार्थ्यांना उपयोगी ठरणार आहे, असे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

सतीश लळीत यांना प्रतिष्ठेचा पं. सेतूमाधवराव पगडी पुरस्कार

गेली २६ वर्षे सातत्याने केलेल्या कातळशिल्प संशोधनकार्याची दखल घेऊन अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेने २०२६चा प्रतिष्ठेचा मानला जाणारा ज्येष्ठ इतिहास संशोधक पं. सेतूमाधवराव पगडी पुरस्कार कातळशिल्प संशोधक सतीश लळीत (सिंधुदूर्ग) यांना जाहीर केला आहे. परिषदेचे अध्यक्ष प्रा. नामदेव गरड आणि...

राज्य नाट्य स्पर्धेसाठी पत्रकार संघाकडून ‘ही परी अस्मानीची’!

मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे यंदाच्या ६५व्या राज्य नाट्य स्पर्धेसाठी ‘ही परी अस्मानीची’ या नाटकाची निवड करण्यात आली आहे. या नाटकाच्या नाट्यसंहितेचे पूजन लोकनेते, माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पत्रकार संघाच्या सभागृहात करण्यात आले. यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाचे...

आंतरशालेय तायक्वांडो स्पर्धेत खेलो तायक्वांडो अकादमीचे घवघवीत यश

मुंबईत नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालेय तायक्वांडो स्पर्धेत खेलो तायक्वांडो अकादमीच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत विविध वजनी गटांत १४ सुवर्ण, ९ रौप्य आणि १२ कांस्य पदकांची, अशी एकूण ३५ पदकांची घसघशीत कमाई केली. १४ आणि १७ वर्षांखालील या दोन...
Skip to content