Homeएनसर्कलयुट्यूब-इन्स्टावरचे सल्ले ठरतायत...

युट्यूब-इन्स्टावरचे सल्ले ठरतायत ‘जेन-झी’ला धोकादायक!

सध्या शेअर बाजारात गुंतवणुकीचा एक नवा आणि वेगवान ट्रेंड पाहायला मिळत असून, ‘जेन-झी’ म्हणजेच आजची तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर शेअर बाजाराकडे वळत आहे. स्मार्टफोन आणि विविध ट्रेडिंग ॲप्सच्या सहज उपलब्धतेमुळे डिमॅट खाती उघडणाऱ्या तरुणांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. तरुण गुंतवणूकदार आता मुदतठेवी (एफडी)सारख्या पारंपरिक गुंतवणुकीचे पर्याय सोडून थेट शेअर बाजारात आणि डेरिव्हेटिव्ह्ज (एफ अँड ओ)मध्ये नशीब आजमावत आहेत. मात्र, या वाढत्या उत्साहामागे एक मोठी चिंतेची बाब दडलेली असून, यावर बाजार नियामक मंडळ ‘सेबी’ने गुंतवणूकदारांना सतर्क केले आहे. शेअर बाजाराची पुरेशी माहिती आणि अभ्यास नसतानाही अनेक तरुण गुंतवणूकदार युट्यूब, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवरील ‘फिनफ्लुएंसर्स’च्या सल्ल्यांवर आंधळा विश्वास ठेवत आहेत. हे इन्फ्लुएंसर्स आकर्षक रील्स आणि व्हिडिओंच्या माध्यमातून कमी वेळेत जास्त परतावा मिळवण्याचे आमिष दाखवतात आणि विशिष्ट स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. तरुण पिढी या ग्लॅमरस व्हिडिओ आणि दाव्यांना भुलून स्वतःचा पैसा अशा शेअर्समध्ये गुंतवत आहे, ज्याची त्यांना कोणतीही तांत्रिक (टेक्निकल) किंवा मूलभूत (फंडामेंटल) माहिती नसते.

९४ टक्के रिलस्टार परवान्याशिवाय सल्लागार

या वाढत्या धोक्याची गंभीर दखल घेत ‘सेबी’ने एक धक्कादायक वास्तव उघड केले आहे. माहितीनुसार, सोशल मीडियावर आर्थिक सल्ला देणाऱ्या या कथित तज्ज्ञांपैकी केवळ ६ टक्के इन्फ्लुएंसर्स सेबीकडे अधिकृतरीत्या नोंदणीकृत आहेत. याचाच अर्थ, उर्वरित ९४ टक्के लोक कोणत्याही अधिकृत परवान्याशिवाय शेअर बाजाराचे सल्ले वाटत आहेत. यातले अनेकजण केवळ स्वतःच्या फायद्यासाठी किंवा विशिष्ट शेअर्सची कृत्रिम दरवाढ (पंप अँड डंप स्कीम्स) करण्यासाठी नवख्या गुंतवणूकदारांची दिशाभूल करत असतात, ज्यामुळे तरुणांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते.

युट्यूबर, इन्स्टाग्रामरच्या टिप्सआधारे गुंतवणूक टाळा

या पार्श्वभूमीवर, शेअर बाजारात सुरक्षित गुंतवणूक करण्यासाठी अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक बनले आहे. कोणत्याही युट्यूबर किंवा इन्स्टाग्रामरच्या सांगण्यावरून गुंतवणूक करण्यापूर्वी, ती व्यक्ती ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार (आरआयए) आहे की नाही, याची खात्री करणे अनिवार्य आहे. कॉर्पोरेट नियमन आणि बाजारातील पारदर्शकता राखण्यासाठी सेबी कठोर पावले उचलत असली तरी, गुंतवणूकदारांनी स्वतःचा अभ्यास वाढवणे, कंपनीची माहिती घेणे आणि प्रमाणित तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच गुंतवणूक निर्णय घेणे, हाच भविष्यातील आर्थिक धोके टाळण्याचा सर्वात खात्रीशीर मार्ग आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

एमपीएससी परीक्षाअर्जासाठी मुदतवाढ

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी)ने विविध शासकीय विभागांमधील एकूण ५,७०७ पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६करिता ऑनलाईन अर्ज सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे. आता उमेदवारांना १० ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहेत. उमेदवारांची...

सेव्हन स्क्वेअर अकॅडमीच्या अंडर-17 मुली मुखर्जी फुटबॉल जिल्हा विजेत्या

युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद, ठाणे आणि मीरा-भाईंदर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा नुकतीच मीरा-भाईंदर येथे उत्साहात पार पडली. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सेव्हन स्क्वेअर अकॅडमीच्या अंडर-17 मुलींच्या फुटबॉल संघाने उत्कृष्ट सांघिक...

शिवसेना खटलाः विधिमंडळ पक्षापेक्षा राजकीय पक्षाचेच वर्चस्व!

शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाच्या वादावर उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे गटाच्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात बुधवारी, ५ ऑगस्ट रोजी महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान ठाकरे गटाचे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी तब्बल तीन तास जोरदार युक्तीवाद करत, विधानसभा...
Skip to content