Homeन्यूज अँड व्ह्यूजदेवाभाऊ को गुस्सा...

देवाभाऊ को गुस्सा क्यों आया?

मुंबई महानगर क्षेत्र आणि पुण्यात पहिल्याच पावसाने बोजवारा उडवून दिला. या पावसाने मुंबईतील यंत्रणा कोसळल्या. त्याचबरोबर सहा हजार सातशे कोटी रुपये खर्च करून उभारलेला मुंबई-पुणे मिसिंग लिंक रोड रोडवर दरडी कोसळल्याने सरकारची लक्तरे वेशीवर टांगली गली. वसई, नालासोपारा, विरार येथील नागरिकांच्या सहनशक्तीचा अंत झाला. चार-चार दिवस या भागात वीजच नव्हतेी. मोबाईल यंत्रणा कोसळून पडल्या होत्या. विशेष म्हणजे भर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान या पावसाने सरकारची अब्रू वेशीवर टांगल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचंड भडकले. त्यांनी घाईघाईत स्वतः सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना मिसिंग लिंकजवळ पाठवून हा रस्ता दोन दिवसांत सुरू करण्यास भाग पाडले.
मुंबई महानगरपालिकेत उद्धवसेनेवर टीका करून भाजप आणि शिवसेनेने मुंबई महापालिकेत वर्चस्व मिळवले. परंतु पहिल्याच पावसात मुंबईची अवस्था बिकट झाली. अधिवेशन असल्याने त्यावर वरवरची मलमपट्टी करण्यात आली. मुंबईत महापालिका प्रशासन सपशेल अयशस्वी झाल्याचे मुंबईकरांना दिसले. पहिल्याच पावसात मुंबईची ही अवस्था झाली असेल तर आता पुढच्या पावसात ही अवस्था अधिक बिकट होण्याची शक्यता आहे.

देवाभाऊ

नालेसफाई व्यवस्थित न झाल्याने पाणी तुंबण्याची समस्या निर्माण झालीच, आणि याचा फटका रेल्वेलाही बसला. रेल्वेशेजारचे नाले तुंबल्याने पश्चिम आणि मध्य रेल्वे ठप्प झाली.
यावरून विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारवर जोरदार टीका केली. परंतु मुख्यमंत्र्यांना ही टीका सहन झाली नाही. हल्ली एक फॅशन झाली आहे, केंद्र सरकारवर टीका करणारे राष्ट्रद्रोही आणि राज्य सरकारवर टीका करणारे महाराष्ट्रद्रोही. भाजपने आणि त्यांच्या महायुतीतील पक्षाने आपण आपले अपयश झाकण्यासाठी या दोन संकल्पना वापरल्या आहेत. मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्रातील विकासावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सरकारचे आणि महापालिका प्रशासनाचे अपयश झाकण्यासाठी विरोधकांना महाराष्ट्रद्रोही ठरवले. म्हणजे विरोधकानेी सरकारच्या चुका दाखवायच्या नाहीत, अशी त्यांची धारणा होती. परंतु देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या परिपक्व राजकारणी व्यक्तीची जीभ यावेळी घसरली. टीका करणाऱ्यांना त्यांनी हीन पातळीवर येत उत्तर दिले. ही अपेक्षा फडणवीस यांच्याकडून नव्हती.

देवाभाऊ

नैसर्गिक संकटाला फडणवीस यांच्याऐवजी दुसरा मुख्यमंत्री असता तरी तो तोंड देऊ शकला नसता. परंतु आपल्या चुका मान्य करण्याऐवजी देवाभाऊंनी विरोधकांना महाराष्ट्रद्रोही ठरवले. त्याचे कारणही वेगळेच होते. आदल्याच दिवशी मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीला जाऊन आले होते. त्यावेळी सरकारी कार्यक्रमानंतर गृहमंत्री अमित शाह आणि त्यांची वेगळी भेट झाली होती. ही भेट होण्यामागचीही कारणेही गंभीर होती. मुख्यमंत्र्यांच्या एका निकटवर्तीयांनी मुंबईतील प्राईम प्लॉटवरील एसआरए प्रकल्प हाती घेतले आहेत. यावरून सरकारवर जोरदार टीकाही होत आहे. या संदर्भातील तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच अमित शाह यांच्याकडे केली आहे. उपमुख्यमंत्र्यांकडे गृहनिर्माण आणि नगरविकास ही दोन खाती असल्याने त्यांनी या बिल्डरच्या फाइल्स आपल्याकडे दाबून ठेवल्या आहेत. उपमुख्यमंत्री शिंदे यांना फाईल पाठवा, असे सांगण्याचे धैर्य मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे नाही. त्यामुळे त्यांनी नगरविकास सचिवांना बोलावून झापले, ही गोष्ट लपून राहिलेली नाही. याचा जाब स्वतः गृहमंत्री अमित शाह यांनी विचारल्याने आदल्या रात्रीपासूनच मुख्यमंत्री फडणवीस अस्वस्थ होते. त्यात दुसऱ्या दिवशी विरोधकांनी मुंबई महानगर प्रदेश आणि पुण्यात झालेल्या पावसामुळे उडालेल्या बोजवाऱ्यावरून विधानसभेतच घेरले. परिणामी मुख्यमंत्री देवाभाऊंची मजल विरोधकांना महाराष्ट्रद्रोही ठरवेपर्यंत गेली. आता पुन्हा पावसाला सुरूवात झाली आहे. यावेळी मुख्यमंत्रीमहोदय विरोधकांवर कशा पद्धतीने बरसतात ते पाहायचे!

(लेखक नितीन सावंत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत. संपर्कः 9892514124)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

ठाकरेंच्या ‘किचन कॅबिनेट’मध्येच होता अस्तनीतला निखारा!

सचिन अहिर ठाकरे कुटुंबियांना धडा शिकवून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत निघून गेले. खरे म्हणजे सचिन अहिर यांचे राजकारण बारा वर्षांपूर्वी सुनील शिंदे या निष्ठावान शिवसैनिकाने संपवले होते. सचिन अहिर राज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री असताना सुनील शिंदे यांनी वरळी मतदारसंघात...

विधानपरिषदेच्या निवडणुकीत कोणाची सरशी?

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधानपरिषदेवर जाणाऱ्या 16 जागांची निवडणूक जाहीर झाली आहे. 18 जूनला ही निवडणूक होत असून या निवडणुकांचा निकाल 22 जूनला लागेल. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबल्यामुळे या निवडणुकाही लांबल्या आहेत. यापैकी नऊ आमदारांची मुदत 2022...

पक्षाचा अजेंडा राबविला गेला विधान परिषद निवडणुकीतून!

विधान परिषद निवडणूक अपेक्षेप्रमाणे बिनविरोध झाली. आमदारांच्या संख्याबळानुसार भाजपला सर्वाधिक जागा या निवडणुकीत मिळाल्या. भाजपचे प्रदेश संघटन सचिव सुनील कर्जतकर, ठाण्याच्या पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख माधवी नाईक, संजय भेंडे आणि माजी सहकार मंत्री शंकरराव कोल्हे यांचे नातू विवेक कोल्हे...
Skip to content