Homeन्यूज ॲट अ ग्लांसमतदारांना भुरळ घालण्यासाठी...

मतदारांना भुरळ घालण्यासाठी बाळगली 1,400 कोटींची अवैध सामग्री

भारतात 2024 साली लोकसभेसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांपासून, नुकत्याच झालेल्या आसाम, केरळम्, पुदुच्चेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या विधानसभा निवडणुका तसेच 5 राज्यांमधल्या 7 विधानसभेच्या पोटनिवडणुकांदरम्यान मतदारांना भुरळ घालण्यासाठी तब्बल 1,400 कोटी रुपयांहून अधिक किमतीची बेकायदेशीर सामग्री बाळगली होती. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिपत्याखाली विविध तपासयंत्रणांनी निवडणुकांच्या कालावधीत ही सामग्री जप्त केली.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन होत आहे हे सुनिश्चित करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने अनेक उपाययोजना केल्या होत्या. पश्चिम बंगालमधील फाल्टा विधानसभा मतदारसंघाचा अपवाद वगळता अन्य सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये असलेली आदर्श आचारसंहिता आता मागे घेण्यात आली आहे. निवडणुकांच्या प्रक्रियेदरम्यान, निवडणूक आयोगाने, ज्या राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशांत निवडणुका होत आहेत त्या, तसंच त्यांच्या सीमेलगतची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव, मुख्य निवडणूक  अधिकारी, पोलीस महासंचालक, वरिष्ठ अधिकारी तसंच अंमलबजावणी संस्थांच्या प्रमुखांसोबत अनेक आढावा बैठका घेतल्या. निवडणुका हिंसा, धमक्या तसेच प्रलोभनमुक्त होतील हे सुनिश्चित करण्यासाठी, प्राप्तीकर, सीमाशुल्क आणि अप्रत्यक्ष कर, लेखा परीक्षण आणि लेखा सेवा, संरक्षण लेखा सेवा, टपाल आणि दूरसंचार लेखा आणि वित्तीय सेवा, अशा  विविध प्रशासकीय सेवांमधील 376 खर्चनिरीक्षक, 7,470 भरारी पथके आणि 7,470 स्थिर पाळत पथकेदेखील तैनात करण्यात आली होती.

निवडणूक जप्ती व्यवस्थापन प्रणालीमुळे, जप्तीची कारवाई सुलभ झाली. या प्रणालीमुळे, विविध संस्थांमधील परस्पर समन्वय वाढला. त्यामुळे कारवाई करण्यासाठी, माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी सुसंवाद निर्माण झाला. 26 फेब्रुवारी 2026 रोजी ईएसएमएस प्रणाली कार्यान्वित करण्यात आली. त्या दिवसापासून 6 मे 2026पर्यंत, करण्यात आलेल्या एकंदर जप्तीचा तपशील खालीलप्रमाणे:

S.NStateCash(Rs.Crores)Liquor Qty(Litres)Liquor Value (Rs. Crores)Drugs Value (Rs. Crores)Precious Metal Value (Rs. Crores)Freebies/Other (Rs.Crores)Total (Rs.Crores)
1 .Tamil Nadu105. 22137248. 534. 9478. 61165. 86307. 65662. 28
2.West Bengal31 . 145858648. 98151 . 86130. 2869. 36190. 77573. 41
3.Assam6. 07828248. 3322. 7170. 083. 6814. 7117. 24
4.Kerala12. 1278215. 32. 5158. 472. 255. 3380. 67
5.Puducherry0. 3318340. 350. 3908. 990. 029. 72
TOTAL154. 896988793. 38183. 33337. 88250. 14518. 731444. 96

या तक्त्यातली आकडेवारी, 2021 साली झालेल्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील  सार्वत्रिक निवडणुकांच्या तुलनेत, जप्तीमध्ये 40.14 टक्क्यांनी वाढ झाल्याचं दर्शवते. 2021च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या दरम्यान ही जप्ती 1029.93 कोटी रुपये होती. 2021 साली, प. बंगाल आणि तामिळनाडूत झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या तुलनेत, प. बंगालमध्ये सर्वाधिक 68.92% आणि तामिळनाडूमध्ये 48.40% वाढ दिसून येत आहे.

Continue reading

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...
Skip to content