Homeएनसर्कलटिव्ही पत्रकारितेचा चेहरामोहरा...

टिव्ही पत्रकारितेचा चेहरामोहरा बदलणारे दिग्गज टेड टर्नर यांचे निधन

जगातील पहिली २४ तास बातम्या देणारी वृत्तवाहिनी ‘सीएनएन’ सुरू करून टेलिव्हिजन (टिव्ही) पत्रकारितेचा चेहरामोहरा बदलणारे दिग्गज माध्यम सम्राट टेड टर्नर यांचे वयाच्या ८७व्या वर्षी नुकतेच निधन झाले. १९८०मध्ये त्यांनी ‘केबल न्यूज नेटवर्क’ची स्थापना केली, ज्याने ठराविक वेळेत बातम्या देण्याच्या प्रस्थापित पद्धतीला छेद देत अहोरात्र ‘ब्रेकिंग न्यूज’ देण्याची नवी संस्कृती रूजवली. १९९०-९१मधील आखाती युद्धाच्या थेट आणि सविस्तर कव्हरेजमुळे सीएनएनला जागतिक स्तरावर एक वेगळी ओळख प्राप्त झाली आणि टर्नर यांचे नाव जगभर पोहोचले.

एक धाडसी व्यावसायिक आणि जोखीम घेणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टर्नर यांनी केवळ माध्यम क्षेत्रातच नव्हे, तर क्रीडा आणि नौकानयन क्षेत्रातही स्वतःचा ठसा उमटवला होता. व्यावसायिक स्पोर्ट्स क्लबची मालकी आणि स्पर्धात्मक नौकानयन संघाचे नेतृत्त्व यामुळे ते नेहमीच चर्चेत राहिले. हॉलिवूड अभिनेत्री जेन फोंडा यांच्याशी झालेला त्यांचा विवाह आणि त्यानंतर त्यांनी स्वतःला वाहून घेतलेले सामाजिक व पर्यावरणीय कार्य हे त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचे पैलू होते. त्यांच्या निधनामुळे जागतिक माध्यम विश्वातील एका धडाडीच्या पर्वाचा अस्त झाला आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content