Homeटॉप स्टोरीमी हरलेच नाही,...

मी हरलेच नाही, मग राजीनामा का देऊ? ममतांचा सवाल!

मी हरलेच नाही तर मग राजीनामा कशासाठी देणार, असा सवाल करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिला. मी हरलेच नाही. मला हरवले गेले आहे. त्यामुळे लोकभवन म्हणजेच राजभवनावर जाऊन मी राजीनामा देणार नाही. नैतिकदृष्ट्या माझाच आणि माझ्याच पक्षाचा विजय झाला आहे, असे त्यांनी आज संध्याकाळी एका पत्रकार परिषदेत सांगितले.

प. बंगालमध्ये भवानीपूर मतदारसंघातून ममता बॅनर्जी विधानसभेची निवडणूक लढल्या. मात्र, यात त्यांचा भाजपाच्या शुभेंदू अधिकारी यांच्याकडून १५१०५ मतांनी पराभव झाला. यानंतर येत्या विधानसभेत त्या आमदार म्हणून दिसणार नाहीत. तृणमूल काँग्रेसच्या इतर कोणत्यातरी आमदाराला राजीनामा देण्यास सांगून त्याजागी होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून तुम्ही पुन्हा विधानसभेत येणार का, असे विचारले असता ममता बॅनर्जी म्हणाल्या की, या विधानसभेत मी असणार नाही. संपूर्ण कार्यकाळ मी रस्त्यावर असेन. विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला मजबूत करेन. भाजपाविरोधात सक्षमपणे लढेन.

प. बंगालच्या सध्याचा कार्यकाळ येत्या सात मेपर्यंत आहे. तोपर्यंत ममता बॅनर्जींना आपले मुख्यमंत्रीपद सोडावे लागेल. केंद्रीय निवडणूक आयोगाने तेथील राज्यपालांसाठी नव्या विधानसभेचे गठन करण्याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष समित भट्टाचार्य यांनी येत्या ९ मे रोजी नवे मुख्यमंत्री प. बंगालमध्ये शपथ घेतील, असे जाहीर केले आहे. भाजपाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्त्वाखाली निरीक्षकांचे एक शिष्टमंडळ बंगालमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन दिवसांत प. बंगालमध्ये भाजपाचे आमदार एका बैठकीत आपला गटनेता निवडतील. त्यानंतर नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मार्ग मोकळा होईल.

ममता बॅनर्जींनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास नकार दिल्यानंतर राज्यपाल बंगालमध्ये काही काळासाठी राष्ट्रपती शासन लागू करू शकतात. ते ममता बॅनर्जींना विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मंजूर करून घेण्याचे निर्देशही देऊ शकतात. किंवा राज्यपाल घटनेच्या १६४व्या अनुच्छेदानुसार ममता बॅनर्जींना मुख्यमंत्रीपदावरून हटवू शकतात. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीची काल मतमोजणी झाली. यात भाजपाला २९४ सदस्यांच्या विधानसभेत भाजपाला २०७ तर तृणमूल काँग्रेसला ८० जागा मिळाल्या. दरम्यान, आज प. बंगालमध्ये अनेक ठिकाणी भाजपा आणि तृणमूलच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचे कळते.

Continue reading

राज्य नाट्य स्पर्धेसाठी पत्रकार संघाकडून ‘ही परी अस्मानीची’!

मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे यंदाच्या ६५व्या राज्य नाट्य स्पर्धेसाठी ‘ही परी अस्मानीची’ या नाटकाची निवड करण्यात आली आहे. या नाटकाच्या नाट्यसंहितेचे पूजन लोकनेते, माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पत्रकार संघाच्या सभागृहात करण्यात आले. यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाचे...

आंतरशालेय तायक्वांडो स्पर्धेत खेलो तायक्वांडो अकादमीचे घवघवीत यश

मुंबईत नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालेय तायक्वांडो स्पर्धेत खेलो तायक्वांडो अकादमीच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत विविध वजनी गटांत १४ सुवर्ण, ९ रौप्य आणि १२ कांस्य पदकांची, अशी एकूण ३५ पदकांची घसघशीत कमाई केली. १४ आणि १७ वर्षांखालील या दोन...

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...
Skip to content