Homeकल्चर +डॉ. उज्ज्वला चक्रदेव...

डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांच्या ‘निळाई’चे प्रकाशन

भरारी प्रकाशन, मुंबई आयोजित प्रसिद्ध कवयित्री डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांच्या ‘निळाई’ या नवीन काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा नुकताच मुंबईतील विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयाच्या सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला साहित्य क्षेत्रातील मान्यवरांची आणि रसिक श्रोत्यांची विशेष उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान साहित्य अकादमीचे कार्यकारी मंडळ सदस्य डॉ. नरेंद्र पाठक यांनी भूषवले.

यावेळी बोलताना त्यांनी डॉ. चक्रदेव यांच्या कवितांमधील भावविश्व आणि त्यांच्या लेखणीची वैशिष्ट्ये उलगडून दाखवत संग्रहाचे कौतुक केले. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव डॉ. मीनाक्षी पाटील उपस्थित होत्या. साठ्ये महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. माधव राजवाडे यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती लाभली.
या प्रकाशन सोहळ्याचे नेटके नियोजन भरारी प्रकाशनच्या प्रकाशिका लता गुठे यांनी केले. स्मिता आपटे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. रंजना वडेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Continue reading

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड...
Skip to content