मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात, येत्या रविवारी, ५ एप्रिलला सायंकाळी पाच वाजता संस्थेचे संस्थापक डॉ. एस. जी. जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भारती प्रताप यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम श्रीकृष्ण जोशी यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे. यावेळी भारती प्रताप यांना तबल्यावर यति भागवत तर संवादिनीवर ज्ञानेश्वर सोनवणे साथ देतील. कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल.
अधिक माहितीसाठी संपर्क- ७७००९९४४९५


