Homeटॉप स्टोरीट्विटने युद्ध थांबवता...

ट्विटने युद्ध थांबवता येत नाही! इराणने ट्रम्पना सुनावले!!

युद्ध सुरू करणे सोपे आहे. ट्विटने ते थांबवता येत नाही. अमेरिकेला याची किंमत मोजावीच लागेल, अशा शब्दांत इराणचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अली लारीजानी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना काल रात्री सुनावले. कालच इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्लाह मोजतबा खामेनेई यांनीही पहिल्यांदाच एक संदेश जारी केला. अमेरिकी हल्ल्यात शहीद झालेल्या लोकांचा बदला घेतला जाणार, मध्य पूर्व आशियातले अमेरिकेचे सगळे तळ उद्ध्वस्त करणार, होर्मूज सामुद्रधुनी अमेरिका व त्यांच्या मित्रराष्ट्रांसाठी बंदच राहणार आणि या युद्धात झालेले नुकसान अमेरिकेकडून भरून घेणार, असे मोजतबा यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

ट्रम्प

काल रात्रभर अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणच्या विविध भागांवर बॉम्बचा वर्षाव होत राहिला तर इराणनेही या हल्ल्याला चोख प्रत्त्युत्तर दिले. अमेरिका तसेच इस्त्रायलकडून लेबनॉन तसेच इराणच्या तेहरान, इस्फहान, करज, कूम, अराक आदी ठिकाणी बॉम्बहल्ले करण्यात आले. इराणने काल रात्री अमेरिकेच्या एका लढाऊ विमानात हवेत इंधन भरणाऱ्या अत्याधुनिक विमानावर ड्रोनहल्ला करत इराकमध्ये पाडल्याचा दावा केला आहे. अमेरिकेने हा अपघात असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेच्या अब्राहम लिंकन युद्धनौकेवरही इराणकडून हल्ला करण्यात आला. त्याचा व्हिडिओही इराणने जारी केल्याचे कळते. इराकच्या इरबील येथील फ्रान्सच्या लष्करी तळावरही इराणने हल्ला केला. त्यात फ्रान्सचे सहा सैनिक जखमी झाल्याचे समजते. दुबईत बूर्ज खलिफा, या प्रसिद्ध इमारतीनजीक असलेल्या एका वित्तीय केंद्रावरही इराणने हल्ला केला. मनामामधल्या अमेरिकेच्या लष्करी तळालाही इराणने आपले लक्ष्य केले. दुबई, कुवैत, बाहरीन, इराक आदी देशांवर इराणचे हल्ले सुरूच आहेत.

ट्रम्प

दरम्यान, काल रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे राष्ट्रपती पेजेश्कियान यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. आम्ही शांती आणि चर्चेच्या बाजूने आहोत. भारतीयांची सुरक्षा आमच्याकरीता महत्त्वाची आहे, असे आपण त्यांना सांगितल्याचे मोदी यांनी नंतर एका ट्विटद्वारे स्पष्ट केले. इराणने कालपासून होर्मूझच्या सामुद्रधुनीतून भारतीय जहाजांना जाण्यास परवानगी दिल्यानंतर भारतीय जहाजांची होर्मूझ सामुद्रधुनीतली रेलचेल वाढल्याचे बोलले जाते.

इराणच्या ताज्या इशाऱ्यानंतर अमेरिकेच्या विविध शहरांमध्ये इराणकडून ड्रोनहल्ले होण्याची शक्यता गृहित धरून अलर्ट जारी करण्यात आले आहे. तिथली पोलीसयंत्रणा यादृष्टीने कार्यरत झाल्याचे कळते.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content