Homeचिट चॅटआरंभ स्पोर्ट्स मल्लखांब...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेच्या मान्यतेने आयोजित करण्यात आली होती.

स्पर्धेसाठी मॅक्स प्रोटीन व पटूक पॉलिटेक्निक ट्रस्ट यांचे मोलाचे सहकार्य लाभले. स्पर्धेच्या उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभास स्थानिक आमदार संजय उपाध्याय, नगरसेवक शिवानंद शेट्टी, डॉ. मीता सेटा, करुणाकर शेट्टी या मान्यवरांची उपस्थिती लाभली. या स्पर्धेत पार्थ धारोड, सनया पवार या समता क्रीडा भवनच्या दोन्ही खेळाडूंची अनुक्रमे पुरुष, महिला गटात सर्वोत्तम मल्लखांबपटू म्हणून निवड करण्यात आली. पुरुष गटाचे सर्वसाधारण विजेतेपद विद्यामंदिर, दहिसर व दहिसर स्पोर्ट्स फाउंडेशन या दोन्ही संघांना विभागून देण्यात आले, तर महिला विभागाचे सर्वसाधारण विजेतेपद समता क्रीडा भवन यांनी पटकावले. ही स्पर्धा मल्लखांब या पारंपरिक भारतीय क्रीडा प्रकाराच्या उत्कृष्टतेचा व शिस्तीचा गौरव करणारी ठरली.

Continue reading

‘एआय’च्या नादात ‘कोअर’ विषयांकडे नका करू दुर्लक्ष!

सध्या सगळीकडे 'एआय'(आर्टिफिशियल इंटेलिजन्स) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि 'डेटा सायन्स'ची हवा आहे. पण, तुम्ही जर याच वर्षी इंजिनीअरिंगला ॲडमिशन घेण्याचा विचार करत असाल, तर हा रिपोर्ट तुमच्यासाठी 'गेम चेंजर' ठरू शकतो. प्रसिद्ध करिअर सल्लागार जयप्रकाश गांधी यांनी विद्यार्थ्यांना एक...

‘महिला आरक्षण’ हे जातीनिहाय जनगणनेला बगल देण्याचे षडयंत्र!

पंतप्रधान नरेंद्र मोदी महिला आरक्षणाचा वापर केवळ जातीनिहाय जनगणना लांबणीवर टाकण्यासाठी करत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी केला आहे. आरक्षणाच्या नावाखाली सरकार मुख्य मुद्द्यांपासून जनतेचे लक्ष भरकटवत असल्याची टीका त्यांनी केली. सोनिया गांधी यांच्या मते, सरकारला देशातील...

जगातल्या १० सर्वात उष्ण शहरांत अकोला दुसऱ्या क्रमांकावर

महाराष्ट्र सध्या उन्हाच्या भीषण तडाख्याने होरपळून निघत असून, विदर्भातील तापमानाने जागतिक विक्रम मोडायला सुरुवात केली आहे. 'एल डोराडो वेदर' आणि हवामान विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार, जगातील १० सर्वात उष्ण शहरांच्या यादीत विदर्भातील तब्बल ४ शहरांचा समावेश झाला आहे. यात अकोला...
Skip to content