Homeन्यूज ॲट अ ग्लांसअणुऊर्जा नियामक परिषदेच्या...

अणुऊर्जा नियामक परिषदेच्या अध्यक्षपदी ए. के. बालासुब्रमणयन कार्यरत

प्रसिद्ध शास्त्रज्ञ ए. के. बालासुब्रमणयन यांनी नववर्षाच्या दिवशी म्हणजेच 1 जानेवारीला मुंबईतील अणुऊर्जा नियामक परिषद (एईआरबी) अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. त्यांनी डॉ. डी. के. शुक्ला यांच्याकडून पदभार स्वीकारला. एईआरबीमध्ये दाखल होण्यापूर्वी बालासुब्रमणयन यांनी प्रकल्प डिझाईन सुरक्षा समितीचे अध्यक्षपद भूषवले आहे. ही समिती प्रेशराईज्ड हेवी वॉटर रिअॅक्टर – पीएचडब्ल्यूआर आधारित अणुऊर्जा प्रकल्पांसाठी कार्यरत आहे.

ए. के. बालासुब्रमण्यन एक प्रतिष्ठित शास्त्रज्ञ असून, ते अणु अभियांत्रिकीचे प्रशिक्षण घेतलेले यांत्रिकी शाखेचे अभियंता आहेत. इंडियन नॅशनल अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगचे ते फेलो आहेत. अणुऊर्जा प्रकल्पांची रचना, विकास, सुरक्षा मूल्यांकन, बांधकाम व कार्यान्वयन या सर्व क्षेत्रांत त्यांना जवळपास 40 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी पीएचडब्ल्यूआर अणुभट्ट्यासांठी

व्यवस्थापन धोरण तयार केले आहे. त्यातली उपकरणे जसजशी जुनी होतात, त्यांची सुरक्षितता आणि कार्यक्षमता टिकवण्यासाठी आखलेली तपासणी, देखभाल आणि सुधारणा यांच्या व्यवस्थापनात, योजना विकासात त्यांना व्यापक अनुभव आहे.

पहिल्यांदाच तयार केलेल्या प्रणालींच्या नवोन्मेषी रचनांमध्ये, सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये आणि स्वदेशीकरणाच्या प्रयत्नांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. अणुभट्टी तंत्रज्ञानातले ते तज्ज्ञ मानले जातात. पीएचडब्ल्यूआरव्यतिरिक्त इतर अणुभट्ट्यांच्या (रिअॅक्टर) तंत्रज्ञानातलेही त्यांना चांगले ज्ञान आहे. पूर्वी ते न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एनपीसीआयएल-भारतीय अणुऊर्जा महामंडळ)च्या संचालक (तांत्रिक) पदावर कार्यरत होते. अणुभट्टी तंत्रज्ञान व सुरक्षा यावर अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी भाग घेतला आहे.

Continue reading

१७२ शेतकऱ्यांच्या उड्डाणाने सुरू झाले नोएडा विमानतळ!

उत्तर प्रदेशच्या विमानवाहतुकीत आज एक ऐतिहासिक टप्पा गाठला गेला. जेवर येथील नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज व्यावसायिक प्रवासी विमानसेवा अधिकृतपणे सुरू झाली. या भव्य ग्रीनफिल्ड विमानतळावर आज सकाळी पहिले विमान यशस्वीरित्या उतरले. केंद्रीय नागरी विमानवाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू...

अमेरिका आणि इराण समझोता तात्पुरता! पुन्हा संघर्ष चिघळणार?

गेल्या साडेतीन महिन्यांपासून सुरू असलेल्या अमेरिका आणि इराणच्या संघर्षात अखेर समेट झाल्याचे अमेरिकेने जाहीर केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या काल झालेल्या वाढदिवशी अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करार अंतिम झाल्याचे जाहीर केले. समाजमाध्यमावर पोस्ट करत ट्रम्प यांनी...

मुंबई महापौर ॲक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्सः आचार्य विद्यानिकेतन अजिंक्य

यजमान नारायणराव आचार्य विद्यानिकेतन संघाने मुंबई महापौर चषक निमंत्रित ॲक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत आपली विजयी परंपरा कायम राखताना विजेतेपदाचा मान पटकावला. चेंबूर येथील विद्यानिकेतनच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेत १५ संघातील २५०पेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग होता. २००२ ते २०२६दरम्यान झालेल्या या...
Skip to content