Homeटॉप स्टोरीAIमुळे साखरेच्या उताऱ्यात...

AIमुळे साखरेच्या उताऱ्यात 20% तर ऊस उत्पादनात 30% वाढ!

AI तंत्रज्ञानामुळे ऊस उत्पादनात 30% वाढ आणि साखरेच्या उताऱ्यात 20% वाढ यशस्वीपणे साधता आली आहे. शिवाय, पीकवाढीचा कालावधी 6 महिने कमी झाला आहे. बारामती कृषी विज्ञान केंद्र आणि ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या प्रक्षेत्रावर हा AI आधारित ऊस शेतीचा प्रयोग करण्यात आला. बारामतीचा सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) आणि मायक्रोसॉफ्ट ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवण्यात आला.

AI आणि सॅटेलाइट इमेजिंगच्या मदतीने पिकांची वाढ, पाण्याची गरज, रोग, हवामान याचा अचूक अंदाज घेतला जातो. त्यामुळे पाणी वापर 50%ने कमी होतो. प्रति एकर उत्पादन 73 टनांवरून 150 टनांपर्यंत वाढू शकते आणि साखरेचा उतारा 10%पेक्षा जास्त मिळतो. यामुळे शेतकऱ्यांचा नफा आणि साखर कारखान्यांचा कार्यकालही वाढतो.

AI परिणामकारकता कशी मोजली गेली?

तुलनात्मक प्रयोग: दोन वेगवेगळ्या प्लॉट्सवर – एकावर पारंपरिक पद्धतीने आणि दुसऱ्यावर AI तंत्रज्ञान वापरून ऊसाची लागवड केली गेली.

ऊस

मोजमापाचे निकष: प्रति एकर उत्पादन (टनमध्ये)

  – साखरेचा उतारा (सुक्रोज कंटेंट)

  – पाण्याचा वापर

  – खत आणि कीटकनाशकांचा वापर

  – खर्च आणि नफा

  – पीकवाढीचा कालावधी (महिन्यांत)

डेटा संकलन: IoT सेन्सर्स, सॅटेलाइट इमेजिंग, हवामान केंद्र, जमिनीचे परीक्षण, आणि मोबाइल ॲपद्वारे रिअल-टाइम डेटा गोळा केला गेला.

प्रमुख वाण: CO 86032, CO M 265, MS 10001, PDN 15012, CO VSI 8005, CO VSI 18121. यापैकी CO M 265 वाणाने 150.10 टन प्रति एकर, PDN 15012 ने 120.40 टन/एकर, CO VSI 8005 ने 104.78 टन/एकर उत्पादन दिले.

शेतकऱ्यांचा सहभाग: पहिल्या टप्प्यात 1,000 शेतकरी सहभागी; पुढील टप्प्यात 50,000 शेतकऱ्यांपर्यंत विस्तार.

सेंद्रिय कर्ब: AI तंत्रज्ञानामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब 1.0% राखला गेला, पारंपरिक शेतीत तो 0.68% होता.

या प्रयोगातील पूरक डेटा आणि तुलनात्मक निकाल हे महाराष्ट्रातील इतर साखर कारखान्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहेत.

Continue reading

पाकिस्तानी खेळाडूंना भारताचे दरवाजे खुले!

भारत सरकारने आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा आणि धोरणात्मक निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने बहुपक्षीय क्रीडा स्पर्धांसाठी पाकिस्तानी खेळाडूंना भारतात येण्यास 'ग्रीन सिग्नल' दिला आहे. मात्र, दोन्ही देशांमधील द्विपक्षीय क्रीडा संबंधांवरील बंदी अद्याप कायम ठेवण्यात आली आहे....

बेंगळुरूचा पत्ता कट! आयपीएल फायनल आता अहमदाबादमध्ये!!

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६च्या अंतिम सामन्याच्या यजमानपदाबाबत मोठी उलथापालथ झाली आहे. गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी)चे होमग्राऊंड असलेल्या बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमकडून फायनलचे यजमानपद हिसकावून घेण्यात आले आहे. आता आयपीएल २०२६चा अंतिम सोहळा ३१ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र...

उद्धव ठाकरे करणार रजनीश काकडेंच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन

मुंबई प्रेस क्लबने त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वेस्थानकाजवळच्या वास्तूत दिवंगत ज्येष्ठ छायाचित्र-पत्रकार रजनीश काकडे यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन येत्या ८ मेपासून आयोजित केले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजता या...
Skip to content