Skip to content
Homeन्यूज ॲट अ ग्लांसपोप फ्रान्सिस यांच्या...

पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्कारानिमित्त उद्या भारतात शासकीय दुखवटा

पोप फ्रान्सिस यांच्या पार्थिवावर उद्या, शनिवारी 26 एप्रिलला अंत्यसंस्कार केले जातील. त्यानिमित्त उद्या देशभरात शासकीय दुखवटा पाळला जाईल. उद्या संपूर्ण भारतात नियमितपणे राष्ट्रध्वज फडकवला जाणाऱ्या इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवला जाईल तसेच कोणताही अधिकृत मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित केला जाणार नाही. व्हॅटिकन सिटीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. भारताचे प्रतिनिधी म्हणून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यावेळी उपस्थित राहणार आहेत.

केंद्र सरकारने पोप फ्रान्सिस यांच्या निधनाबद्दल आदरांजली वाहण्यासाठी तीन दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर केला. 22 आणि 23 एप्रिलला दोन दिवसांचा शोक पाळण्यात आला तसेच अंत्यसंस्काराच्या दिवशी म्हणजे उद्या एका दिवसाचा राष्ट्रीय शोक पाळला जाईल. पोप फ्रांसिस हे एकविसाव्या शतकातील पोप आहेत. ते २६६वे पोप आहेत. ते अमेरिका खंडातून निवड झालेले सर्वप्रथम आणि पोप ग्रेगरी तिसऱ्यानंतर पोपपदी येणारे युरोपाबाहेरचे पहिले पुरुष आहेत. पोप फ्रान्सिस यांचे मूळ नाव होर्हे मारियो बेर्गोलियो होते. 17 डिसेंबर 1936 रोजी त्यांचा जन्म झाला. वयाच्या 88व्या वर्षी 21 एप्रिल 2025 रोजी त्यांचे निधन झाले.

Continue reading

एफटीआयआयच्या चित्रपट रसग्रहण अभ्यास प्रवेशाला मुदतवाढ

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीतील भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेने (एफटीआयआय) यंदाच्या मध्यात होऊ घातलेल्या चित्रपट रसग्रहण अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याच्या कालावधीत वाढ केली आहे. हा अभ्यासक्रम पुण्यात 23 जून ते 11 जुलै 2025 या कालावधीत घेतला जाणार आहे....

विसडम चेस स्पर्धेत अधवान, कथितचे नॉनस्टॉप जेतेपद

शाळेची सुट्टी संपण्यापूर्वी शालेय बुद्धिबळपटूंसाठी विसडम चेस अॅकॅडमीने आयोजित केलेल्या दुसऱ्या चेस मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेला खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. ७ वर्षांखालील गटात अधवान ओसवाल आणि ८ वर्षांखालील गटात कथित शेलारने नॉनस्टॉप सहा विजय नोंदवत अव्वल सहा गुणांसह बाजी मारली...

भरत गिते ‘बिझनेस आयकॉन’ पुरस्काराने सन्मानित

तौरल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी भरत गिते फ्रँकफर्ट येथील महाराष्ट्र-युरोप बिझनेस फोरममध्ये ‘बिझनेस आयकॉन ऑफ द इयर २०२५’ या प्रतिष्ठित पुरस्काराने नुकतेच सन्मानित झाले. फ्रँकफर्ट (जर्मनी) येथे झालेल्या महाराष्ट्र-युरोप बिजनेस फोरमच्या विशेष कार्यक्रमात गिते यांना हा...