Homeचिट चॅट७ मार्चला 'मुंबई...

७ मार्चला ‘मुंबई श्री’चा धमाका!

मुंबईतील शरीरसौष्ठवपटूंच्या हृदयात सर्वोच्च स्थानी असलेल्या मुंबई श्री २०२५, या जिल्हा अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेचा धमाका येत्या ७ मार्चला अंधेरी पश्चिमेला सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबसमोरील लोखंडवाला गार्डन येथे होणार आहे. या स्पर्धेला जे राय फिटनेसचे पाठबळ लाभले आहे. या थराराला यंदाही आंतरराष्ट्रीय स्पर्धेसारखाच दर्जा आणि विजेत्यांना मान-सन्मान दिला जाणार असल्याचे बृहन्मुंबई आणि उपनगर शरीरसौष्ठव संघटनेचे आजीवन अध्यक्ष अमोल कीर्तीकर आणि अध्यक्ष अजय खानविलकर यांनी सांगितले.

मुंबई श्री म्हणजे दिमाखदार आयोजन नव्हे तर खेळाडूंना श्रीमंत करणारी स्पर्धा. या लौकिकानुसार मुंबई श्री स्पर्धेतील मुख्य फेरीतील ८, फिजीक स्पोर्ट्सचे २ आणि महिलांचा एक अशा ११ गटांमधून किमान २५० खेळाडू सहभाग घेतील, असा प्राथमिक अंदाज आहे. संदीप सावळे, गणेश उपाध्याय, भगवान बोराडे, विशाल धावडे, उबेद पटेल, संकेत भरम, अभिषेक लोंढे, सौरभ म्हात्रे, अरुण नेवरेकर, अमति साटम, संजय प्रजापती, अमोल जाधवसारखे खेळाडू आपले मुंबई श्रीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न करतील. स्पर्धेतील विजेत्याला सवा लाखांचे इनाम दिले जाणार आहे. द्वितीय विजेता आणि तृतीय विजेत्याला अनुक्रमे ५० आणि २५ हजार रुपयांचे रोख इनाम दिले जाईल. ही स्पर्धा एकंदर आठ गटात होणार असून गटातील अव्वल पाच खेळाडूंना प्रत्येकी १०, ८, ६, ४, २ हजार रोख बक्षीस लाभेल. एवढेच नव्हे तर पुढील पाच क्रमांकानाही एक हजारांचे उत्तेजनार्थ बक्षीस दिले जाईल. या स्पर्धेत खेळाडू मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्यामुळे वजनतपासणी आणि प्राथमिक चाचणी ७ मार्चला स्पर्धेच्या ठिकाणीच सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत केली जाणार असल्याची माहिती उपनगर संघटनेचे सरचिटणीस विशाल परब यांनी दिली.

शरीरसौष्ठव खेळात आता राष्ट्रीय पातळीवर दिवसेंदिवस फिजीक स्पोर्ट्स आणि महिलांच्या शरीरसौष्ठवाची क्रेझ वाढू लागली आहे. स्पर्धेत स्पर्धकांचा सहभाग वाढत असल्यामुळे आयोजकांना या गटांकडेही आपले लक्ष केंद्रित करावे लागत आहे. पुरुषांच्या फिजीक स्पोर्ट्समध्ये खेळाडूंची सहभाग संख्या शंभराच्या आसपास असल्यामुळे हा गट दोन गटात विभागला गेला आहे. हे दोन्ही गट उंचीवर खेळविले जाणार असल्यामुळे त्यांची १७० सेमीपर्यंत आणि १७० सेमीवरील अशी विभागणी करण्यात आली आहे. महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत मिस मुंबई या किताबासाठी संघर्ष होणार असल्यामुळे पुन्हा एकदा रेखा शिंदे आपले जेतेपद राखण्यासाठी प्रयत्न करील. तिला किमया बेर्डे, ममता येझरकर, राजश्री मोहिते, रिद्धी पारकर आणि के लविना यांच्याशी तगडी लढत द्यावी लागणार असल्याची माहिती सरचिटणीस राजेश सावंत यांनी दिली.

मुंबई श्री म्हटले की सहभागासाठी खेळाडूंची अक्षरशा झुंबड उडते. त्यामुळे कुणाचीही गैरसोय होऊ नये म्हणून सुनील शेगडे (९२२३३४८५६८), राजेश निकम (९९६९३६९१०८), राम नलावडे (९८७०३०६१२७), किरण कुडाळकर (९८७०३०६१२७), विजय झगडे (९९६७४६५०६३), जयदीप पवार (८०८०८०९४३८), गिरीश कोटियन (७७३८५४५२३०), सुभाष जाधव (९००४३१३४३९) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन उपनगर संघटनेचे अध्यक्ष किट्टी फणसेका यांनी शरीरसौष्ठवपटूंना केले आहे.

Continue reading

सरकारने शेतकऱ्यांची थट्टा थांबवावी!

ऐन दिवाळीच्या तोंडावर दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या हातात भरीव मदत देण्याऐवजी अवघ्या पाच हजार रुपयांची घोषणा करून राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, डोळ्यांसमोर उद्ध्वस्त झालेली पिके, कर्जाचा डोंगर आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न या पाच हजार...

रजेवर भिमनवार; एमपीएससीच्या हंगामी अध्यक्षपदी वाघोले स्वार!

राज्याच्या विधि न्याय विभाग आणि संसदीय कार्य विभागाचे निवृत्त सचिव सतीश वाघोले यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) हंगामी (प्रभारी) अध्यक्षपदी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी नियुक्ती केली आहे. एम.पी.एस.सी.च्या प्रश्नपत्रिका फुटत असल्याच्या प्रकरणावरून एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्यासाठी...

राष्ट्रीय स्लिंगशॉट स्पर्धेत गौरव मोकाशींना सुवर्णपदक

१४वी राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिप-२०२६ स्पर्धा छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ४० ते ४५ वर्षे वयाच्या गटात दहिसर, मुंबईचे गौरव मोकाशी यांनी सुवर्णपदक पटकावले. या आधीच्या राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिपमध्ये त्यांना रौप्यपदक मिळाले होते....
Skip to content