Homeबॅक पेजमाझी माऊली चषक...

माझी माऊली चषक शालेय कॅरम स्पर्धा ३ ऑक्टोबरपासून

मुंबईतल्या सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळ-जेजे व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे आंतर शालेय १६ वर्षांखालील मुलांची विनाशुल्क कॅरम स्पर्धा ३ ते ११ ऑक्टोबरदरम्यान दैवत रंगमंच, जे.जे. हॉस्पिटल कंपाऊंड, भायखळा-पूर्व येथे आयोजित करण्यात आली आहे. विजेत्या-उपविजेत्यांना एकूण १६ आकर्षक चषक-मेडल पुरस्कार दिले जाणार असल्याची माहिती नवरात्र महोत्सव मंडळाचे सरचिटणीस भूषण परुळेकर यांनी दिली.

शालेय मुख्य कॅरम स्पर्धेअगोदर मुंबई व इतर जिल्ह्यातील शालेय खेळाडूंना स्पर्धात्मक सराव मिळण्यासाठी यंदादेखील २४वी शालेय कॅरम स्पर्धा भरविण्यात आली आहे. सबज्युनियर कॅरमपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी चँम्पियन कॅरम बोर्डावर दर्जेदार स्पर्धेचे पूर्णपणे मोफत आयोजन करण्यात येणार आहे. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या शालेय खेळाडूंनी प्रवेशअर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी संयोजक लीलाधर चव्हाण अथवा मंडळाचे कार्यवाह चंद्रकांत करंगुटकर (९९८७८ ३१६२२) यांच्याकडे २९ सप्टेंबरपर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष कृष्णा रेणोसे यांनी केले आहे.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content