Homeमुंबई स्पेशलमुंबई महापालिकेची पथके...

मुंबई महापालिकेची पथके रायगड व कोल्हापूरला रवाना

रायगड आणि कोल्हापूरमधल्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापनाकडून काल रात्री दोन पथके मुंबईहून रवाना झाली. यात आरोग्य आणि जल तसेच घनकचरा व्यवस्थापनविषयक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

मुंबई महापालिका आपत्कालीन परिस्थितीत पालिका क्षेत्राबाहेरदेखील तत्परतेने मदतकार्य करीत असते. याच अनुषंगाने काल मुंबई महापालिकेची २ पथके रायगडच्या व कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाली. रायगड व कोल्हापूरच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या पथकांचे नियोजन अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त  (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे.

मुंबई महापालिकेचा एक पथक रायगड जिल्ह्यातील महाड येथे मदतकार्य करण्यास रवाना झाले आहे. यामध्ये दोन वैद्यकीय चमू, १ फिरती वैद्यकीय प्रयोगशाळा, घनकचरा व्यवस्थापन खात्यातील सुमारे ७५ कर्मचारी, पाण्याचे ४ टँकर, १ टोईंग लॉरी इत्यादींचा समावेश आहे. वैद्यकीयविषयक बाबींचे व्यवस्थापन पालिकेच्या लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी करीत आहेत. आपत्कालीन व्यवस्थापनविषयक कार्यवाही पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाचे संचालक महेश नार्वेकर करीत आहेत.

कोल्हापूर येथील पूरबाधित परिसरातील पर्जन्य जलवाहिन्या आणि मलनिस्साःरण वाहिन्यांविषयी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या दृष्टीने पालिकेची आणखी एक टीम कोल्हापूरकडे रवाना झाली आहे. कोल्हापूरच्या दिशेने प्रस्थान केलेल्या संबंधित कर्मचाऱ्यांच्या चमूसोबत ‘रिसायकल मशीन’ आणि इतर आवश्यक यंत्रसामग्रीदेखील पाठविण्यात आली आहे. यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप मुख्य अभियंता सुनील सरदार यांचीही मदत घेण्यात येत आहे.

२०१९मध्ये कोल्हापुरात अशाच स्वरूपाची पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळीही महापालिकेच्या विविध विभागांतर्फे कोल्हापुरात विविध नागरी सेवा सुविधा सुसज्ज करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत होते.

Continue reading

अवघ्या दोन तासांतच गुंतवणूकदारांचे ९ लाख कोटी मातीमोल!

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी गुरुवारचा दिवस उजाडताच अत्यंत पडझडीचा ठरला आहे. कच्च्या तेलाच्या भडकलेल्या किमती आणि जागतिक अस्थिरतेमुळे भारतीय शेअर बाजारात सकाळी ९ वाजल्यापासूनच 'भूकंप'सदृश स्थिती पाहायला मिळाली. सुरुवातीच्या अवघ्या दोन तासांच्या व्यवहारात गुंतवणूकदारांचे सुमारे ९ लाख कोटी रुपये मातीमोल झाले....

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग ‘वेपिंग’ करताना कॅमेऱ्यात कैद!

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या चालू हंगामात राजस्थान रॉयल्सने मैदानावर उत्कृष्ट कामगिरी करत विजय मिळवला असला, तरी सध्या चर्चा मात्र त्यांच्या विजयाची नाही, तर कर्णधार रियान परागच्या एका वादग्रस्त कृत्याची होत आहे. ड्रेसिंग रूममध्ये बसलेला असताना रियान पराग 'वेपिंग' (ई-सिगारेटचा...

सुरक्षादलांशी झालेल्या चकमकीत माओवादी इस्रायल पूर्ती ठार

झारखंडमधील पश्चिम सिंगभूम जिल्ह्यातील सारंडा वनक्षेत्रात सुरक्षादलांसोबत झालेल्या भीषण चकमकीत 'पीपल्स लिबरेशन फ्रंट ऑफ इंडिया' (पीएलएफआय)चा सक्रिय सदस्य आणि १ लाख रुपयांचे बक्षीस असलेला नक्षलवादी इस्रायल पूर्ती मारला गेला आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, कोब्रा २०९ बटालियन, झारखंड पोलीस...
Skip to content