Homeकल्चर +रविवारी आनंद घ्या...

रविवारी आनंद घ्या मंजुषा पाटील यांच्या गायनाचा!

मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, ११ ऑगस्टला विद्वय पलुस्कर संगीत सभांतर्गत मंजुषा पाटील यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. केंद्राच्या वा. वा. गोखले वातानुकूलित सभागृहात हा कार्यक्रम सायंकाळी पाच वाजता होणार असून तो सर्वांसाठी खुला आहे. यावेळी त्यांना तबल्यावर प्रशांत पांडव तर संवादिनीवर सुयोग कुंडलकर साथ देणार आहेत.

मंजुषा पाटील ग्वाल्हेर आणि आग्रा घराण्याच्या गायिका आहेत. त्यांचे संगीताचे शिक्षण वयाच्या बाराव्या वर्षी चिंतुबुवा म्हैसकर यांच्याकडे सांगली येथे सुरू झाले. त्यांनी १९९८ तसेच २००३मध्ये सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात, बालगंधर्व, भीमसेन महोत्सव, तानसेन समारोह, धारवाड येथील ‘उस्ताद रहमत खाँसाहेब महोत्सव’ अशा व अनेक इतर संगीत महोत्सवांमध्ये आपली कला सादर केली आहे. भारतात अनेक ठिकाणी तसेच शिकागो, लंडन, सिंगापूर, मस्कत या देशांतही शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम त्यांनी केले आहेत. त्यांना पंडित जसराज गौरव, माणिक वर्मा, गुरुवर्य बी. एस. उपाध्ये स्मृती, संगीत शिरोमणी, उस्ताद बिस्मिल्ला खान आणि कुमार गंधर्व पुरस्कार मिळाले आहेत.

Continue reading

१५ वर्षांखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेत ‘एसआयईएस’ विजेती

गोरखनाथ महिला संघ आयोजित व गौरी शंकर क्रीडा मंडळाच्या सहकार्याने महिला दिनाचे औचित्य साधून मुंबईत आयोजित केलेल्या १५ वर्षांखालील शालेय मुलींच्या कबड्डी स्पर्धेत एसआयईएस शाळेने विजेतेपद पटकावले. कुर्ला येथील गांधी मैदानात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात एसआयईएस शाळेने...

नवनिर्वाचित खासदार वडकुते यांचा के. रवि यांच्या हस्ते सत्कार

राज्यसभेवर नुकतीच निवड झालेल्या रामराव वडकुते यांचा भव्य सत्कार मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात नुकताच उत्साहात पार पडला. इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंट, मुंबई यांच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन कंपनीचे संचालक...

सिद्धार्थ महाविद्यालयाच्या नूतनीकरणासाठी शासनाकडून ४२ कोटी!

पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या फोर्ट, मुंबई येथील सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी नुकतीच भेट दिली. त्यावेळी त्यांनी ४२ कोटी मंजूर केले असल्याचे जाहीर केले. गेल्या वर्षी मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे आयोजित केलेल्या संस्थेच्या...
Skip to content