Homeकल्चर +२ ऑगस्टला प्रदर्शित...

२ ऑगस्टला प्रदर्शित होणार ‘बारदोवी’!

मानवी नातेसबंध, तांत्रिक, रहस्य, अतर्क्य घटना असलेल्या ‘बारदोवी’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला. या ट्रेलरने चित्रपटाविषयीची उत्कंठा वाढवली असून कसलेले अभिनेते, गुंतवणारं कथानक असलेला हा चित्रपट २ ऑगस्टला भारतात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

“बारदोवी” या आगामी चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला. करण चव्हाण यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. सतोरी एन्टरटेन्मेंट प्रस्तुत “बारदोवी” या चित्रपटाची निर्मिती कृष्णार्पण मोशन पिक्चर्स, शुभारंभ मोशन पिक्चर्स यांनी केली आहे. अमित जाधव, अर्जुन जाधव, प्रणित वायकर, संदीप काळे, एल्विन राजा या चित्रपटाचे निर्माते आहेत तर छाया कदम सहनिर्मात्या आहेत. संतोष तांबे, रवीराज वायकर, अभिजित पाटील, नितीन पाटील सहायक निर्माता आहेत. छाया कदम यांच्यासह चित्रपटात चित्तरंजन गिरी, विराट मडके यांच्यासारखे कसलेले कलावंत आहेत. विक्रम पाटील यांनी कॅमेरा, अरविंद मंगल यांनी प्रोडक्शन डिजाइन आणि विकास डिगे कार्यकारी निर्माता आहेत.

चित्रपटाचा ट्रेलर मती गुंग करणारा आहे. चित्रपटाचं चित्रिकरण आणि व्हीएफएक्स उच्च दर्जाचे आहेत. त्यामुळे कसदार कथानकाला दमदार तांत्रिक बाजू, पार्श्वसंगीताची साथ असल्याचं ट्रेलरवरून दिसून येतं. म्हणूनच हा चित्रपट हिंदीतील वेगळा अनुभव देणारा ठरणार आहे. ट्रेलरमुळेच चित्रपटाविषयीची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content