Homeचिट चॅटरक्षाबंधनाच्या भेटवस्तूंसाठी ‘ट्राइब्ज...

रक्षाबंधनाच्या भेटवस्तूंसाठी ‘ट्राइब्ज इंडिया’!

ट्राइब्ज इंडिया, हे तुमच्या कुटुंबियांना आणि मित्रपरिवाराला द्यायच्या भेटवस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारे आदर्श ठिकाण आहे. ट्राइब्ज इंडिया, येथे आदिवासी उत्पादनांच्या आकर्षक आणि उत्कृष्ट हस्तकलेच्या तसेच धातूंच्या वस्तू, वस्त्रे आणि सेंद्रिय हर्बल उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

यंदा ट्राइब्ज इंडिया कॅटलॉगमध्ये खास राखी विभाग तयार केला आहे. स्नेह आणि आधाराचे प्रतीक असणाऱ्या रक्षाबंधन उत्सवाची तयारी करताना आपण भेटवस्तू निवडण्यासाठी आपल्या जवळच्या ट्राइब्ज इंडिया दुकानाला किंवा संकेतस्थळाला अवश्य भेट द्या.

त्यात देशभरातील आदिवासींनी हाताने बनविलेल्या राख्या, पूजेसाठी वापरले जाणारे धातूचे डबे आणि तोरण आदी सजावटीच्या वस्तू मिळू शकतात. याव्यतिरिक्त, ट्राइब्ज इंडियामध्ये पुरुष आणि स्त्रिया दोघांसाठी रंगीबेरंगी कुर्ते, सलवार, वेगवेगळ्या प्रकारच्या वस्त्र शैलीतील जॅकेट्स तसेच माहेश्वरी, चंदेरी, बाग, कंठा, भंडारा, तुसार, संभालपुरी आणि इकत इत्यादी प्रकारातील साड्या, कपडे उपलब्ध आहेत.

आदिवासींच्या विविध वस्तू आणि उत्पादनांच्या विकास आणि विपणनाद्वारे आदिवासींचे जीवनमान उंचावून त्यांचे सबलीकरण करण्याच्या प्रयत्नांच्या अनुषंगाने ट्रायफेड ट्राइब्ज इंडिया आपल्या देशभरातील दालनांमधील विक्रीसाठी ठेवलेल्या विविधांगी व आकर्षक श्रेणीतील उत्पादनांची व्याप्ती वाढवत आहे. देशातील 137 ट्राइब्ज इंडिया दालने आणि ई-कॉमर्स मंच (www.tribesindia.com) इथे ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करणारी उत्पादने उपलब्ध करून देतात.

कठपुतळीसारख्या मुलांच्या खेळण्यांपासून ते पारंपरिक विणकामापर्यंत जसे की डोंग्रिया शाल आणि बोडो विणकाम असलेली उच्च प्रतीची आणि विविधांगी वस्त्रप्रावरणे आणि रेशमी वस्त्रे; धातू शिल्प ते बांबू उत्पादने; अशी कोणतीही आणि प्रत्येक प्रकारची भेटवस्तू इथे उपलब्ध आहे. सर्व भेटवस्तूसाठी सेंद्रिय, पुनर्चक्रीकरणीय, शाश्वत वेष्टन साहित्य वापरले जाते, ज्याची रचना सुप्रसिद्ध डिझायनर रीना ढाका यांनी केली आहे.

Continue reading

टिपू सुलतानप्रकरणी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची दिलगिरी

भारतीय जनता पार्टीने माझ्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास केला. सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवल्या. मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घातले आणि टीपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याचा चुकीचा समज निर्माण केला आला. भाजपा...

अजितदादांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करा!

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली. आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष तटकरे, ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ तसेच युवा...

‘काळा घोडा’ महोत्सवात मुंबई महापालिकेचे बचत गट मालामाल

मुंबईची सांस्कृतिक ओळख असलेल्या काळा घोडा कला महोत्सवात यंदा कलेसोबतच सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणाचा आदर्श पाहायला मिळाला. मुंबई महापालिकेच्या पुढाकाराने सहभागी झालेल्या १८ नोंदणीकृत महिला बचत गटांनी ९ दिवसांत ८ लाख ५४ हजार ५०० रुपयांच्या साहित्याची विक्री करून स्वयंरोजगाराच्या...
Skip to content