Homeडेली पल्स.. आणि मुख्यमंत्री...

.. आणि मुख्यमंत्री शिंदेंसमोर चिमुकलीने फिटवली आपली हौस!

हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगलीतील वाळवा येथील प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटला काल रात्री उशिरा भेट दिली. यावेळी याठिकाणी आयोजित केलेल्या भारतीय जनता पक्षाच्या बूथप्रमुखांच्या मेळाव्याला मुख्यमंत्री शिंदे यांनी संबोधित केले.

मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू होताच एक चिमुकली हळूच हातात मोबाईल घेऊन त्यांचा फोटो काढण्यासाठी पुढे सरसावली. मुख्यमंत्र्यांनी तिला पाहिले. मात्र बराच उशीर झाला असल्याने त्यांनी आपले भाषण सुरू ठेवले. पण या काळात तिने मात्र आपल्या मोबाईलमध्ये मुख्यमंत्र्यांचे फोटो काढण्याची हौस मनसोक्तपणे पूर्ण करून घेतली.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content