Homeडेली पल्सबजाज फायनान्सकडून मुदतठेवींच्या...

बजाज फायनान्सकडून मुदतठेवींच्या व्याजदरात वाढ

देशातील सर्वात मोठ्या वित्तीय सेवा समुहांतील बजाज फिनसर्व्हचा एक मुख्य भाग असलेल्या बजाज फायनान्स लिमिटेडने आपल्या मुदत ठेव (एफडी) योजनांच्या बहुतांश कालावधीसाठी व्याजदरात वाढीची घोषणा केली आहे. कंपनीने ज्येष्ठ नागरिकांसाठी २५ ते ३५ महिन्यांच्या कालावधीतील मुदत ठेवींच्या व्याजदरात ६० अंशांपर्यंत (०.६ टक्क्यांपर्यंत) वाढ केली आहे तर १८ ते २४ महिन्यांच्या कालावधीसाठी व्याजदरात ४० अंशांपर्यंत (०.४ टक्क्यांपर्यंत) वाढ केली आहे. ही दरवाढ ३ एप्रिल २०२४पासून अंमलात आली आहे.

ज्येष्ठ नागरिक नसलेल्या ग्राहकांसाठी, २५ ते ३५ महिन्यांच्या कालावधीतील ठेवींसाठी व्याजदर ४५ अंशांपर्यंत (०.४५ टक्क्यांपर्यत) वाढवण्यात आले आहेत तर १८ आणि २२ महिन्यांच्या कालावधीसाठी व्याजदर ४० अंशाने (०.०४० टक्क्यांनी) तर ३० आणि ३३ महिन्यांच्या कालावधीसाठी ३५अंशांनी (०.३५ टक्क्यांनी) व्याजदर वाढवण्यात आले आहेत.

कंपनीचे हे पाऊल बाजारातील सध्याच्या परिस्थितीत बचत करणाऱ्या व्यक्तींना स्थिर आणि उत्तम परतावा मिळवण्याची संधी देत आहे. ज्येष्ठ नागरिक त्याच्या डिजिटल मुदत ठेवींसाठी ८.८५ टक्क्यांपर्यंत व्याजदर मिळवू शकतात, तर ज्येष्ठ नागरिक नसलेले ग्राहक ४२ महिन्यांच्या कालावधीसाठी डिजिटल मुदत ठेव योजनांकरिता ८.६० टक्क्यांपर्यंत व्याजदरांचा लाभ घेऊ शकतात.

मुदतठेव

बजाज फायनान्सच्या मुदत ठेवी आणि गुंतवणूक विभागाचे प्रमुख सचिन सिक्का म्हणाले की, स्थिरता शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ठेवींच्या अनेक गुंतवणूक प्रकारांत व्याजदर वाढवत आम्ही आकर्षक प्रस्ताव सादर केलेले आहेत. गेली अनेक वर्षे लाखो ठेवीदारांनी बजाज ब्रॅण्डवर त्यांचा दृढविश्वास कायम ठेवलेला आहे. त्यांना उत्तम अनुभव प्रदान करत राहणे, अधिक मूल्य सादर करणे आणि गुंतवणुकीसाठी सुरक्षित असा पर्याय देणे यावर आमचे लक्ष सतत केंद्रीत राहणार आहे.

बजाज फायनान्सच्या ३१ मार्च २०२४अखेर ८३.६४ दशलक्ष ग्राहक फ्रँचाईझी कार्यरत आहेत. तसेच बजाज फायनान्स ३१ मार्च २०२४अखेर देशातील सर्वात मोठी ठेव संकलन करणारी एनबीएफसी (NBFC) कंपनी ठरली आहे. ३१ मार्च २०२४पर्यंत कंपनीच्या एकूण ठेवींची रक्कम ६० हजार कोटी रुपये इतकी आहे. बजाज फायनान्सच्या ॲपवर ३१ डिसेंबर २०२३पर्यंत एकूण ४९.१९ दशलक्ष वापरकर्ते होते. data.io या संस्थेच्या अहवालानुसार बजाज फिनसर्व्ह ॲप हे भारतात प्लेस्टोअरवर (Playstore) वित्तीय डोमेनमध्ये सर्वाधिक डाउनलोड झालेले चौथ्या क्रमांकाचे ॲप ठरले आहे.

बजाज फायनान्सच्या मुदतठेव योजनांना क्रिसीलच्या AAA/स्टेबल आणि इक्राच्या AAA (स्टेबल) असे सर्वोच्च स्थिरतेचे रेटिंग (मानांकन) प्रदान झालेले आहे. हे रेटींग कंपनीच्या ठेवी या गुंतवणूकदारांसाठी सर्वात सुरक्षित गुंतवणूक पर्याय असल्याचे सूचित करते. कंपनीचे ॲप गुंतवणुकीसाठी एक उत्तम मंच ठरला आहे. या अॅपवर ग्राहक म्युच्युअल फंडांच्या विस्तृत श्रेणींची निवड करुन आपली गुंतवणूकसुद्धा सुरु करू शकतात.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content