Homeडेली पल्सधावत्या दुरांतो एक्स्प्रेसमध्ये...

धावत्या दुरांतो एक्स्प्रेसमध्ये तिने दिला मुलीला जन्म..

एलटीटी प्रयागराज दुरांतो एक्स्प्रेसमधील सुखद घटना.. कारण, मुंबई एलटीटीहून प्रयागराजला जाणाऱ्या दुरांतो एक्स्प्रेसमध्ये एका महिलेने गोंडस मुलीला जन्म दिला. सध्याच्या धावत्या युगात एकमेकांकडे पाहण्यासही कोणाला वेळ मिळत नाही. परंतु अजूनही माणुसकी टिकून असल्याचा प्रत्यय या घटनेमुळे दिसून आला आहे. या गाडीमध्ये ड्युटीवर असलेले मध्य रेल्वेतील मुख्य सीटीआय नंदबिहारी मीना आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे माणुसकीचे दर्शन घडविले आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांनीही या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.

महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या होत्या आणि एलटीटी प्रयागराज दुरांतो एक्सप्रेसमध्ये एकच धावपळ उडाली. त्याचवेळी एक्सप्रेसमध्ये असलेले तिकीट तपासनीस महिलेच्या मदतीला धावून गेले आणि सहमहिला प्रवाशांच्या मदतीने या महिलेची सुखरूप प्रसूती झाली. धावत्या एक्सप्रेसमध्ये या महिलेने गोंडस बेबीला जन्म दिला,असे मीना म्हणाले.

कल्याण येथे राहणारे नंदबिहारी मीना, अलोक शर्मा, राजकरण यादव आणि इंद्रकुमार मीना या तिकीट तपासनीस कर्मचाऱ्यांसह इतर सर्वांना ट्रेनमधील महिलेच्या प्रसूतीवेदनांची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ हालचाल करुन दुसऱ्या महिला प्रवाशांची मदत घेतली आणि गर्भवती महिलेची सुरक्षितपणे प्रसूती होण्यास मदत झाली. त्यानंतर तिकीट तपासनीसांनी तत्काळ रेल्वेतील संबंधित यंत्रणेला घटना कळवली. त्यानंतर बुरहानपुर येथे गाडीला आपत्कालीन थांबा देण्याची व्यवस्था झाली. तिथे आई आणि नवजात शिशुला पुढील वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात नेण्यात आले. तेथील सिटी रुग्णालयात आई आणि नवजात बाळ दोघेही व्यवस्थित आहेत,असेही मीना यांनी सांगितले.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content