Homeडेली पल्सराष्ट्रवादीच्या जाहीरनामा समितीच्या...

राष्ट्रवादीच्या जाहीरनामा समितीच्या अध्यक्षपदी दिलीप वळसे पाटील

लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जाहीरनामा समिती स्थापन करण्यात आली असून तिच्या अध्यक्षपदी राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील तर निमंत्रक म्हणून पक्षाचे कोषाध्यक्ष आणि प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे पत्र प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी जारी केले आहे.

या जाहीरनामा समितीमध्ये सदस्य म्हणून राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, डॉ. राजेंद्र शिंगणे, बाबा सिद्दीकी, राष्ट्रीय प्रवक्ते अविनाश आदिक, मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष इद्रीस नायकवडी, ओबीसी सेलचे राज्य समन्वयक ईश्वर बाळबुधे, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, सामाजिक सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे, मुख्य प्रवक्ते उमेश पाटील, प्रदेश प्रवक्ते आणि ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, माध्यम सल्लागार संजय मिस्कीन आदींचा समावेश आहे.

Continue reading

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...
Skip to content