Homeडेली पल्समहाराष्ट्र राज्य लॉटरीचे...

महाराष्ट्र राज्य लॉटरीचे फेब्रुवारीतील सोडतींचा निकाल जाहीर

महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे फेब्रुवारी-२०२४मधील मासिक सोडतींचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.  यामध्ये ९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र सहयाद्री, १६ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र गणेशलक्ष्मी माघी गणपती, २० फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र तेजस्विनी, २१ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र गौरव आणि २४ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र गजराज या मासिक सोडतींचा समावेश आहे.

त्यापैकी महाराष्ट्र सह्याद्री या विक्री झालेल्या तिकीटांमधून ३ हजार ३० तिकीटांना एकूण ७ लाख ५८ हजार ५० रुपये किंमतीची बक्षिसे जाहीर झाली आहेत. महाराष्ट्र गणेशलक्ष्मी माघी गणपती या सोडतीच्या विक्री झालेल्या १ हजार ६८६ तिकीटांना ८ लाख ७० हजार ५०० रुपये किंमतीची बक्षिसे जाहीर झाली आहेत. महाराष्ट्र तेजस्विनी या सोडतीच्या विक्री झालेल्या ९३२ तिकीटांना ६ लाख १५ हजार ७०० रुपये  किंमतीची बक्षिसे जाहीर झाली आहेत. महाराष्ट्र गौरव या सोडतीच्या विक्री झालेल्या तिकीटांमधून ६ हजार ९८१ तिकीटांना ९ लाख २७ हजार किंमतीची बक्षिसे जाहीर झाली आहेत. महाराष्ट्र गजराज या सोडतीच्या विक्री झालेल्या तिकीटांमधून २ हजार ५३३ तिकीटांना २ लाख ८९ हजार ४०० रुपये किंमतीची बक्षिसे जाहीर झाली आहेत.

लॉटरी तिकीट खरेदीदारांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या संकेतस्थळावर देण्यात आलेली प्रक्रिया पूर्ण करून रुपये १० हजारवरील बक्षिसाची मागणी उपसंचालक (वित्त व लेख) महाराष्ट्र राज्य लॉटरी वाशी कार्यालयाकडे सादर करावी. तर १० हजाराच्या आतील बक्षीस रकमेची मागणी विक्रेत्यांकडून करण्यात यावी, असे उपसंचालक (वित्त व लेखा) महाराष्ट्र राज्य लॉटरी यांनी कळविले आहे.

जानेवारीतल्या सोडतीचेही निकाल जाहीर

त्याआधी शासनाने जानेवारी-२०२४ महिन्यातील मासिक सोडतीचे निकालही जाहीर करण्यात आले. १३ जानेवारी २०२४ रोजी महाराष्ट्र सह्याद्री, १७ जानेवारी  रोजी महाराष्ट्र गौरव, २० जानेवारी रोजी महाराष्ट्र गणेशलक्ष्मी न्यू इयर, २४ जानेवारी रोजी महाराष्ट्र तेजस्व‍िनी व २८ जानेवारी रोजी महाराष्ट्र गजराज या मासिक सोडती काढण्यात आल्या आहेत.

त्यापैकी महाराष्ट्र सह्याद्री या विक्री झालेल्या तिकीटांमधून एकूण २ हजार ८६९ तिकीटांना एकूण ७ लाख १८ हजार ८०० रुपये किंमतीचे बक्षीस जाहीर झाले आहेत. महाराष्ट्र गौरव मालिका तिकीट क्रमांक G-38/3627 या मे. प्रिन्स एजन्सी, काळबादेवी, मुंबईकडून विक्री झालेल्या तिकीटास रक्कम ३५ लाख रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस जाहीर झाले आहे. या सोडतीच्या एकूण ६ हजार २४१ तिकीटांना एकूण रू. ४३ लाख ८ हजार रुपये किंमतीचे बक्षीस जाहीर झाले आहेत.

महाराष्ट्र गणेशलक्ष्मी न्यू इयर विक्री झालेले एकूण १ हजार ७०५ तिकीटांना एकूण ८ लाख ८७ हजार रुपये किंमतीचे बक्षीस जाहीर झाले आहेत. महाराष्ट्र तेजस्विनी मालिका तिकीट क्रमांक TJ-02/3241 या महाराजा लॉटरी सेंटर, इचलकरंजीकडून विक्री झालेल्या तिकीटास रक्कम २५ लाख रुपये किंमतीचे प्रथम क्रमांकाचे एक बक्षिस जाहीर झाले आहे. या सोडतीच्या एकूण ९१२ तिकीटांना एकूण ३१ लाख ७१ हजार ८०० रुपये किंमतीचे बक्षीस जाहीर झाले आहेत. महाराष्ट्र गजराज विक्री झालेल्या तिकीटांमधून एकूण २ हजार ६६० तिकीटांना एकूण २ लाख ९८ हजार ३५० रुपये किमतीचे बक्षीस जाहीर झाले आहे.

सर्व खरेदीदारांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या वेबसाईटवर नमूद प्रक्रिया पूर्ण करून १० हजार रुपयेवरील बक्षिसाची मागणी उपसंचालक (वित्त व लेखा) महाराष्ट्र राज्य लॉटरी या कार्यालयाकडे सादर करावी.  रूपये १०, हजाराच्या आतील बक्षीस रकमेची मागणी विक्रेत्यांकडून करावी, असे उपसंचालक (वित्त व लेखा) महाराष्ट्र राज्य लॉटरी यांनी कळविले आहे.

Continue reading

अवघ्या दोन तासांतच गुंतवणूकदारांचे ९ लाख कोटी मातीमोल!

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी गुरुवारचा दिवस उजाडताच अत्यंत पडझडीचा ठरला आहे. कच्च्या तेलाच्या भडकलेल्या किमती आणि जागतिक अस्थिरतेमुळे भारतीय शेअर बाजारात सकाळी ९ वाजल्यापासूनच 'भूकंप'सदृश स्थिती पाहायला मिळाली. सुरुवातीच्या अवघ्या दोन तासांच्या व्यवहारात गुंतवणूकदारांचे सुमारे ९ लाख कोटी रुपये मातीमोल झाले....

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग ‘वेपिंग’ करताना कॅमेऱ्यात कैद!

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या चालू हंगामात राजस्थान रॉयल्सने मैदानावर उत्कृष्ट कामगिरी करत विजय मिळवला असला, तरी सध्या चर्चा मात्र त्यांच्या विजयाची नाही, तर कर्णधार रियान परागच्या एका वादग्रस्त कृत्याची होत आहे. ड्रेसिंग रूममध्ये बसलेला असताना रियान पराग 'वेपिंग' (ई-सिगारेटचा...

सुरक्षादलांशी झालेल्या चकमकीत माओवादी इस्रायल पूर्ती ठार

झारखंडमधील पश्चिम सिंगभूम जिल्ह्यातील सारंडा वनक्षेत्रात सुरक्षादलांसोबत झालेल्या भीषण चकमकीत 'पीपल्स लिबरेशन फ्रंट ऑफ इंडिया' (पीएलएफआय)चा सक्रिय सदस्य आणि १ लाख रुपयांचे बक्षीस असलेला नक्षलवादी इस्रायल पूर्ती मारला गेला आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, कोब्रा २०९ बटालियन, झारखंड पोलीस...
Skip to content