Homeकल्चर +पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांना...

पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांना एकता कला गौरव पुरस्कार!  

भावस्पर्शी संगीताने रसिक श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या चतुरस्त्र गायिका व संगीतकार पद्मश्री पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांना काल मुंबईत साहित्य संघ मंदिरात झालेल्या एका कार्यक्रमात या वर्षाचा ‘एकता कला गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. अभिजित राणे, अशोक लोटणकर, प्रतिभा सराफ, श्रीकांत जाधव, अनिल कदम, वैशंपायन गमरे, किरण आव्हाड, रामचंद्र के यांनाही ‘एकता’च्या अन्य पुरस्करांनी गौरविण्यात आले.

ज्येष्ठ नाट्य अभिनेते अशोक समेळ यांच्या हस्ते महोत्सवाचे उदघाटन झाले. ‘एकता’चे अध्यक्ष कवी प्रकाश ग. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभास कवी भगवान निळे, चित्रकार प्रदीप म्हपसेकर, अभिनेते अनिल गवस, नृत्य दिग्दर्शक अनिल सुतार, महेश दवंडे, चित्रकार भगवान दास आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते नृत्य, अभिनय, काव्य स्पर्धातील विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. सूत्रसंचालन प्रा. अवधूत भिसे यांनी केले अशी माहिती संस्थेचे सचिव प्रकाश पाटील व उपाध्यक्ष उज्जय आंबेकर यांनी दिली.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content