Homeडेली पल्स'आकाश'ची चाचणी यशस्वी!

‘आकाश’ची चाचणी यशस्वी!

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डी. आर. डी. ओ.) काल ओडिशाच्या किनारपट्टीवरील चांदीपूर येथील एकीकृत चाचणी स्थळावरून (आय. टी. आर.) नव्या पिढीच्या आकाश (ए. के. ए. एस. एच.-एन. जी.) क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी घेतली.

अत्यंत कमी उंचीवर वेगवान मानवरहित हवाई लक्ष्याविरूद्ध ही उड्डाण-चाचणी घेण्यात आली. उड्डाण-चाचणीदरम्यान, शस्त्र प्रणालीद्वारे लक्ष्याचा यशस्वीरित्या वेध घेऊन ते नष्ट केले गेले. यामुळे स्वदेशी विकसित रेडिओ फ्रिक्वेन्सी सीकर, लॉन्चर, मल्टी-फंक्शन रडार आणि कमांड, कंट्रोल आणि कम्युनिकेशन प्रणालीसह क्षेपणास्त्राचा समावेश असलेल्या संपूर्ण शस्त्र प्रणालीच्या कार्यास मान्यता मिळाली आहे.

आय. टी. आर., चांदीपूरने तैनात केलेल्या अनेक रडार, टेलीमेट्री आणि इलेक्ट्रो ऑप्टिकल ट्रॅकिंग प्रणालीद्वारे मिळवलेल्या माहितीआधारेदेखील प्रणालीची कामगिरी प्रमाणित केली गेली आहे. डी. आर. डी. ओ., भारतीय हवाई दल (आय. ए. एफ.), भारत डायनॅमिक्स लिमिटेड (बी. डी. एल.) आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे (बी. ई. एल.) वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. आकाश-एनजी प्रणाली ही एक अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली आहे. ती वेगवान, चपळ हवाई धोक्यांना रोखू शकते. यशस्वी उड्डाण चाचणीमुळे वापरकर्त्याच्या चाचण्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

उड्डाण चाचणीबद्दल डी. आर. डी. ओ., आय. ए. एफ., सार्वजनिक उपक्रमांचे आणि उद्योगांचे संरक्षण मंत्री सिंह यांनी कौतुक केले आहे. या प्रणालीच्या यशस्वी विकासामुळे देशाची हवाई संरक्षण क्षमता आणखी वाढेल, असे ते म्हणाले. संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डी. आर. डी. ओ. चे अध्यक्ष डॉ. समीर व्ही. कामत यांनीही आकाश-एन. जी. च्या यशस्वी चाचणीशी संबंधित पथकांचे अभिनंदन केले.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content