Homeकल्चर +इंटरनॅशनल पर्पल फेस्टचा...

इंटरनॅशनल पर्पल फेस्टचा गोव्यात शानदार प्रारंभ!

सर्वसमावेशकता आणि सक्षमीकरण यांचा सुंदर मिलाफ असलेल्या इंटरनॅशनल पर्पल फेस्ट 2024 या जागतिक स्तरावरच्या महोत्सवाचा गोव्यात नुकताच शानदार प्रारंभ झाला. 13 जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमाचे आयोजन दिव्यांग व्यक्तींसाठीचे राज्य आयुक्त कार्यालय, गोवा सरकारचे समाज कल्याण संचालनालय आणि भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या दिव्यांग व्यक्तींसाठीच्या सक्षमीकरण विभागाच्या सहकार्याने करण्यात आले आहे.

पर्पल

या महोत्सवाच्या दिमाखदार उदघाटन सोहळ्याला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत प्रमुख अतिथी म्हणून तसेच केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहिले होते. गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजित राणे आणि केंद्रीय पर्यटन, बंदरे आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईकदेखील यावेळी उपस्थित होते. या उद्घाटन समारंभात संगीत, नृत्य आणि मनोरंजनपर आकर्षक आणि बहारदार कार्यक्रमांच्या सादरीकरणातून दिव्यांग व्यक्तींच्या यशोगाथा सादर करणे हा या महोत्सवाचा उद्देश होता.

या उदघाटन समारंभामधील एक अदभुतरम्य क्षण म्हणजे पर्पल फेस्टच्या ‘धुमाळ’ या सर्वसमावेशकता आणि एकतेचे प्रतीक असलेल्या गीताचे सादरीकरण होते. यामध्ये गोव्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अनेक दिव्यांग व्यक्ती आपली कला सादर केली.

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content