Homeडेली पल्सआयआयटी-मुंबईच्या 85 विद्यार्थ्यांना...

आयआयटी-मुंबईच्या 85 विद्यार्थ्यांना वार्षिक 1 कोटी पगाराची नोकरी

आयआयटी मुंबईमध्ये आयोजित प्लेसमेंट हंगाम 2023-24च्या पहिल्या टप्प्याचा नुकताच समारोप झाला. यामध्ये 20 डिसेंबर 2023पर्यंत 1340 नोकरीचे प्रस्ताव  देण्यात आले,  ज्यामुळे 1188 विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली. यामध्ये पीएसयूमध्ये 7 जणांचा तसेच इंटर्नशिपद्वारे 297 पीपीओचा समावेश असून यापैकी नोकरीचे 258 प्रस्ताव स्वीकारण्यात आले आहेत. यात जपान, तैवान, दक्षिण कोरिया, नेदरलँड्स, सिंगापूर आणि हाँगकाँगमधील नोकऱ्यांसह आंतरराष्ट्रीय स्तरावरील नोकऱ्यांचे 63 प्रस्ताव होते. सीटीसीसह वार्षिक ₹1 कोटीपेक्षा जास्त वेतन असलेल्या स्वीकृत नोकऱ्यांच्या 85 प्रस्तावांचाही यात समावेश होता.

आयआयटी मुंबईमधील विद्यार्थ्यांना आपल्या कंपन्यांमध्ये घेण्याकरीता देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय, अशा 388 कंपन्यांनी यात सहभाग घेतला होता. यामध्ये प्री-प्लेसमेंट ऑफर (पीपीओ) देणाऱ्या कंपन्यांसह सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचा (पीएसयू) समावेश होता. विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी आणि क्रॉस ऑफर कमी करण्याच्या दृष्टीने विविध कंपन्यांचे नियोजन आयआयटी मुंबई करते. कंपन्यांनी उमेदवारांशी वैयक्तिकरित्या किंवा आभासी मंचाद्वारे संवाद साधला. सर्व विद्यार्थी संकुलातच मुलाखतीसाठी हजर होते.

या हंगामात एक्सेंचर,एअरबस, एअर इंडिया, ऍपल, आर्थर डी. लिटल, बजाज, बार्कलेज, कोहेसिटी, दा विंची, डीएचएल फुलेरटन, फ्युचर फर्स्ट, जीई-आयटीसी, ग्लोबल एनर्जी अँड एनव्हायरन, गुगल, होंडा आर अँड डी, आयसीआयसीआय-लोम्बार्ड,आयडीया फोर्ज, आयएमसी ट्रेडिंग, इंटेल, जग्वार लँड रोव्हर, जेपी मॉर्गन चेस, जेएसडब्ल्यू , कोटक सिक्युरिटीज, मार्श मॅक्लेनन, महिंद्रा ग्रुप, मायक्रोसॉफ्ट, मॉर्गन स्टॅनले, मर्सिडीज-बेंझ, एल अँड टी, एनके सिक्युरिटीज या अव्वल कंपन्या सहभागी झाल्या होत्या. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान  / सॉफ्टवेअर, वित्त / बँकिंग / फिनटेक, व्यवस्थापन सल्लामसलत, डेटा विज्ञान  आणि अॅनालिटिक्स, संशोधन आणि विकास आणि डिझाइन ही नोकरीचे सर्वाधिक प्रस्ताव देणारी क्षेत्रे होती.

एकूण सरासरी वेतन तसेच प्रमुख क्षेत्रांमधील वेतन खाली सारणीबद्ध केले आहे:

Average CTC in INR (Lakhs Per Annum)
Overall24.02
Engineering & Technology21.88
IT/Software26.35
Finance32.38
Consulting18.68
Research & Development36.94

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content