Homeटॉप स्टोरीमुंबई महापालिकेचा लसखरेदीचा...

मुंबई महापालिकेचा लसखरेदीचा प्रयत्न फसला!

सर्व मुंबईकर नागरिकांना कोविड-१९ प्रतिबंधक लस देण्यासाठी मुंबई महापालिकेने जागतिक स्तरावर प्रसिद्धीस दिलेल्या लस पुरवठा स्वारस्य अभिव्यक्तीमध्ये प्रतिसाद देणारे सर्वच्या सर्व ९ संभाव्य पुरवठादार कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी अपात्र ठरल्याने महापालिकेने आज अखेर लसखरेदीसाठी जाहीर केलेले ग्लोबल टेंडर रद्द केले.

कालच भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते किरीट सोमैय्या यांनी या ९ भागधारकांपैकी ५ भागधारक बोगस असल्याचा आरोप केला होता. एक कोटींचा हा ग्लोबल टेंडरचा घोटाळा थांबविण्यात आपल्याला यश आल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

मुंबई महापालिकेला कोविड लस पुरवठा करण्यासाठी प्रशासनाने जागतिक स्तरावर १२ मे २०२१ रोजी स्वारस्य अभिव्यक्ती (Expression of Interest) प्रकाशित केली. त्यास प्रतिसाद देणाऱ्या संभाव्य पुरवठादारांना (Supplier) आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी प्रशासनाने पहिल्यांदा २५ मे २०२१पर्यंत आणि दुसऱ्यांदा १ जून २०२१पर्यंत अशी दोन वेळा मुदतवाढ दिली. तसेच कागदपत्रांची पूर्तता करण्याचे निर्देश देऊन दूरदृश्य प्रणालीद्वारे सातत्याने चर्चादेखील केली.

विशेषतः लसपुरवठा करण्यास इच्छुक असलेले पुरवठादार आणि प्रत्यक्ष लस उत्पादीत करीत असलेल्या कंपन्या या दोघांच्या दरम्यान असलेले व्यावसायिक संबंध पडताळून पाहणे अत्यावश्यक होते. त्यामुळे दिलेल्या मुदतीत आणि सुरळीतपणे लसपुरवठा होईल, याची खात्री पटेल. त्यासोबत नेमक्या किती दिवसांत लसपुरवठा होईल, किती संख्येने लससाठा पुरवला जाईल, लसीचे दर व रक्कम अधिदान करण्याच्या अटी व शर्ती या ४ मुख्य पैलूंचा अतिशय बारकाईने अभ्यास करुन महानगरपालिका प्रशासन कोविड प्रतिबंधक लससाठा उपलब्ध करण्याविषयी सातत्याने पाठपुरावा करीत होते.

अंतिम मुदतीनंतर एकूण प्राप्त ९ संभाव्य पुरवठादारांनी सादर केलेल्या सर्व आवश्यक कागदपत्रांची महानगरपालिका प्रशासनाने युद्धपातळीवर कार्यवाही करुन छाननी केली. छाननीअंती यातील एकही पुरवठादार संपूर्ण कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी पात्र ठरू शकला नाही, असे महापालिका प्रशासनाने म्हटले आहे.

आता होणार स्पुटनिकसाठी प्रयत्न

असे असले तरी, महानगरपालिका प्रशासनाने कोविड लसीकरणाचे महत्त्व लक्षात घेता, स्पुटनिक या रशियन लसीचे वितरक डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांच्याशी लसपुरवठ्याबाबत आज (४ जून २०२१) संपर्क साधला. त्यांनी प्रायोगिक तत्त्वावर काही प्रमाणात स्पुटनिक लसींचा साठा महानगरपालिकेला देण्याची तयारी दर्शविली आहे.

प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी स्पुटनिक, या रशियन लसीचे वितरक डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांच्याशी आज चर्चा केली. त्यानुसार, प्रायोगिक तत्त्वावर स्पुटनिक लसीचा काही प्रमाणात साठा मुंबई महापालिकेला जून २०२१ अखेरपर्यंत देण्याची तयारी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांनी दर्शविली आहे.

स्पुटनिक लसीच्या शीतगृहातील साठवणुकीचे निकष वेगळे आहेत. त्यामुळे हा साठा मिळाल्यानंतर त्याच्या शीतगृहातील साठवणुकीची चाचपणी करण्यात येईल. तसेच जुलै व ऑगस्ट २०२१ या दोन महिन्यांमध्ये स्पुटनिक लसीचा साठा मोठ्या प्रमाणात देण्याबाबतदेखील डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांच्याकडे विचारणा करण्यात आली आहे. या अनुषंगाने येत्या आठ ते दहा दिवसांत पुन्हा डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांच्यासमवेत चर्चा केली जाणार आहे, असेही पालिकेने स्पष्ट केले.

Continue reading

एलिमेंट्स आर्ट क्लासेसचे अप्रतिम प्रदर्शन

एलिमेंट्स आर्ट क्लासेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी येथे पंचतत्व या तीन दिवसांचे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा ते १८ वर्षे वयोगटातल्या जवळजवळ ४५ विद्यार्थ्यांच्या सुमारे ९० कलाकृती या प्रदर्शनात...

अकरावी प्रवेशासाठी नंतर सादर करा गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला

राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...
Skip to content