Homeकल्चर +जो त्याग करील...

जो त्याग करील त्याला जग लक्षात ठेवील!

जो आपल्या जीवनात त्याग करील त्याला जग लक्षात ठेवील, अशा शब्दांत नाशिक येथील अध्यात्म, ज्योतिष आणि वेदशास्त्रसंपन्न अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांनी त्यागाचे महत्त्व अधोरेखित केले.

ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांनी सुरू केलेल्या जय महाराष्ट्र नगर, बोरीवली पूर्व येथील वसंत व्याख्यानमालेचे यंदाही फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आयोजन करण्यात आले. यंदाच्या ३९व्या वर्षाच्या वसंत व्याख्यानमालेचे पहिले पुष्प अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांनी ‘मानवी जीवनातील पाच विशेष योग’ या विषयावरील व्याख्यानाने गुंफले.

प्रा. नयना रेगे यांनी अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांचा परिचय करुन दिल्यानंतर भगरे गुरुजी यांनी सुमारे दीड तास अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. आज आपल्याला आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा यांची नावे माहित नसतात, ज्यांनी हाडाची काडे करुन आपल्यासाठी संपत्ती जमवून ठेवलेली असते. परंतु महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, वीर सावरकर, सुभाषचंद्र बोस यांची नावे आपण लक्षात ठेवतो, कारण ते आपल्या त्यागातून महान झाले आहेत, असे ते म्हणाले.

ज्या बापूंनी दोन गुंठे जमीन घेतली नाही, परंतु आज प्रत्येकाच्या खिशात बापू आहेत. राष्ट्रासाठी या महान विभूतींनी आपले जीवन झिजविले. त्यागाच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या बलिदानामुळे आज त्यांना संपूर्ण विश्व लक्षात ठेवतो, असे गुरूजींनी सांगितले.

मानवी जीवनातील पाच विशेष योग या विषयावर आपले विचार मांडताना भगरे गुरुजी म्हणाले की, ८४ लक्ष योनींमधून महत्त्वाचा मनुष्य जन्म आपल्याला मिळाला आहे. सहजासहजी हा जन्म मिळत नाही. पण या मनुष्य जन्माचे सार्थक व्हावे म्हणून मानवी जीवनातील पाच विशेष योग आपल्याला अंगिकारणे आवश्यक आहे. वास्तुयोग, कन्यादान योग, चारधाम यात्रा, गोदान आणि मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा हे पाच योग महत्त्वाचे आहेत. ते व्यावहारिक जीवनात अंगिकारणे शक्य आहे आणि ते अंगिकारले तर आपल्या मानवी जीवनाचे, मनुष्य जन्माचे सार्थक होईल.

हे पाचही योग अत्यंत सोप्या शब्दांत अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांनी समजावून सांगितले. कोरोनाच्या आणि लॉकडाऊनच्या काळातसुद्धा चिकाटीने या वसंत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले याबद्दल अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांनी विजय वैद्य यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content