Homeडेली पल्ससणासुदीच्या काळात भारतीयांची...

सणासुदीच्या काळात भारतीयांची देशांतर्गत पर्यटनास पसंती!

कायक या जगातील आघाडीच्‍या ट्रॅव्‍हल सर्च इंजिनने केलेल्‍या नवीन ग्राहक संशोधनानुसार सणासुदीच्‍या काळासह दिवाळी सण जवळ आला असताना भारतीयांची पर्यटनाचा आनंद घेण्‍याप्रती इच्‍छा वाढत आहे. १,२०० भारतीयांचे सर्वेक्षण केलेल्‍या कायक ग्राहक संशोधनामधून निदर्शनास आले की, भारतीय यंदा सणासुदीच्‍या काळात प्रवासाचा आनंद घेण्‍यास उत्‍सुक आहेत. सणासुदीचा काळ नवरात्री व दस-यासह सुरू होत दिवाळी व भाऊबीजेपर्यत सुरू राहिल. अनेकजण आपल्‍या मूळगावी परत जाण्‍याचा काळ आला असताना कायकच्‍या ग्राहक संशोधनामधून निदर्शनास आले की, सर्वेक्षण करण्‍यात आलेल्‍यांपैकी ९८ टक्‍के भारतीयांची सणासुदीच्‍या काळादरम्‍यान भारतात देशांतर्गत पर्यटनास प्रथम पसंती आहे.

पर्यटन

भारतात प्रवास करण्‍याची इच्‍छा असलेल्‍यांसाठी, सर्वेक्षण करण्‍यात आलेल्‍यांपैकी निम्‍मे भारतीय (५४ टक्‍के) देशांतर्गत दोन किंवा अधिक वेळा प्रवास करण्‍याची योजना आखत आहेत. सणासुदीच्‍या काळादरम्‍यान कायकवरील टॉप ट्रेण्डिंग देशांतर्गत गंतव्‍य आहेत मदुराई (वार्षिक शोधांमध्‍ये १६५ टक्‍क्‍यांची वाढ), भुवनेश्‍वर (१०५ टक्‍के) आणि अहमदाबाद (१०३ टक्‍के). फ्लाइट्ससाठी टॉप ट्रेण्डिंग आंतरराष्‍ट्रीय गंतव्‍य आहेत कोलंबो, श्रीलंका (३४० टक्‍के वाढ), हाँगकाँग (१६२ टक्‍के वाढ), सेशेल्स (१३९ टक्‍के वाढ) आणि टोकियो, जपान (१२८ टक्‍के वाढ).

ही माहिती ऑक्‍टोबर व नोव्‍हेंबरदरम्‍यान प्रवासासाठी कायक सर्च डेटाशी (जानेवारी व ऑगस्‍ट २०२३ दरम्‍यान इंडियन आऊटबाऊंड शोधांवर आधारित) संलग्‍न आहे. गेल्‍या वर्षीच्‍या तुलनेत देशांतर्गत विमानसेवा शोधांमध्‍ये २९ टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे आणि आंतरराष्‍ट्रीय विमानसेवा शोधांमध्‍ये १४ टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे.

कायकचे भारतातील कंट्री मॅनेजर तरूण तहिलियानी म्‍हणाले, यंदा सणासुदीचा काळ भारतीय पर्यटकांसाठी उत्‍साहवर्धक असणार आहे, जेथे सर्वेक्षण करण्‍यात आलेल्‍यांपैकी बहुतांश भारतीय बहुप्रतिक्षित ट्रिपचा आनंद घेण्‍यास किंवा डेटानुसार, अनेक ट्रिप्‍सचा आनंद घेण्‍यास सज्‍ज आहेत. सर्वसमावेशक फ्लाइट्स, हॉटेल किंवा कार हायर पर्याय प्रदान करत कायकमध्‍ये आम्‍ही भारतीय पर्यटकांना आकर्षक दरांमध्‍ये परिपूर्ण हॉलिडेचा शोध घेण्‍यास मदत करण्‍याच्‍या मिशनवर आहोत.

७२ टक्‍के भारतीय प्रवास करताना सर्वात आनंददायी बाब म्‍हणजे फूडचा आस्‍वाद घेण्‍यास उत्‍सुक आहेत, तसेच शॉपिंग व स्‍थानिक बाजारपेठांमध्‍ये फेरफटका मारण्‍यास उत्‍सुक आहेत. ४५ टक्‍के भारतीय हॉटेलची निवड करताना ‘फाइव्‍ह-स्‍टार रेस्‍टॉरंट्स’ असलेल्‍या हॉटेल्‍सना प्राधान्‍य देतात.

फूडव्‍यतिरिक्‍त भारतीय पर्यटक गंतव्‍याच्‍या संस्‍कृतीला देखील अधिक महत्त्व देतात. देशातील रहिवाशी सणासुदीच्‍या काळादरम्‍यान ऐतिहासिक व पौराणिक गंतव्‍यांना देखील प्राधान्‍य देतात. जनरेशन एक्‍स (७२ टक्‍के) व बेबी बूमर्स (७५ टक्‍के) प्रवास करताना संस्‍कृती, परंपरा व वारसा असलेल्‍या गंतव्‍यांना प्राधान्‍य देतात, तर ६४ टक्‍के जनरेशन झेड या गंतव्‍यांना प्राधान्‍य देतात. पण तरूण भारतीय – जनरेशन झेड (५८ टक्‍के) व मिलेनियल्‍स (५६ टक्‍के) साहसी गंतव्‍यांना प्राधान्‍य देतात, तुलनेत हे प्रमाण बेबी बुमर्ससाठी ३६ टक्‍के आहे.

Continue reading

‘मालवणी रोंबाट’चे प्रकाशन

कवी अरविंद परुळेकर लिखित 'मालवणी रोंबाट', या अनोख्या साहित्यकृतीचा भव्य प्रकाशन सोहळा काल रविवारी, मुंबईतल्या गोरेगाव येथील प्रज्ञाबोधिनी हायस्कूल हॉलमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमास एखाद्या कौटुंबिक मेळाव्याचे स्वरूप आले होते. कवि अशोक नायगावकर, प्रसाद कुलकर्णी, शशिकांत तिरोडकर, प्रख्यात...

समकालीन भान आणि साहित्यिक मूल्य जपणारा ‘हेमांगी’!

महाराष्ट्रातील दर्जेदार दिवाळी अंकाच्या परंपरेतील महत्त्वाचे नाव म्हणजे ‘हेमांगी’. यंदा ‘हेमांगी’चा ५१वा दिवाळी अंक प्रकाशित झाला. यंदाच्या काही मोजक्या सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकांमध्ये या अंकाचा समावेश करावा लागेल. या अंकात ज्येष्ठ पत्रकार निळू दामले यांनी अमेरिका-इराण युद्धाची नेमकी कारणे कोणती,...

आता टोलनाका ओलांडतानाच तपासला जाणार गाडीचा विमा

वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राष्ट्रीय महामार्गावर टोलनाका ओलांडताना आता फास्टॅगद्वारे केवळ टोलच कापला जाणार नाही, तर वाहनाच्या थर्ड पार्टी विम्याची वैधताही तपासली जाणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय)ने ही नवीन स्वयंचलित यंत्रणा सुरू केली आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर...
Skip to content