Homeडेली पल्सनवीन संसद भवनाच्या...

नवीन संसद भवनाच्या गजद्वारासमोर उपराष्ट्रपतींनी फडकावला राष्ट्रध्वज!

भारताच्या गौरवशाली वारशापासून अमृत काळामधील एका नवीन अध्यायाची नव्याने सुरुवात करताना, उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष, जगदीप धनखड यांनी काल नवीन संसद भवनाच्या गजद्वारासमोर राष्ट्रध्वज फडकावला. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हेही यावेळी उपस्थिती होते.

हा एक ऐतिहासिक क्षण असून भारताच्या विकास प्रवासातला एक मैलाचा दगड ठरणारा हा क्षण आहे असे गौरवउद्गार काढून उपराष्ट्रपती म्हणाले की, भारत युगानुयुगे बदलाचा साक्षीदार ठरलेला आहे आणि जगाला भारताचे सामर्थ्य, पराक्रम आणि योगदानाची ओळख पटलेली आहे.

आपण सध्या अशा काळात जगत आहोत जिथे आपण अशा विकास कार्याचे आणि यशाचे साक्षीदार ठरलेलो आहोत ज्याची आपण स्वप्नातही कल्पना केली नव्हती. आज आपले खरे वास्तव जागतिक स्तरावर अत्यंत सकारात्मक पद्धतीने प्रतिबिंबित होत आहे, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी केंद्रीय मंत्री, विविध राजकीय पक्षांचे संसद सदस्य, राज्यसभा आणि लोकसभेचे महासचिव देखील उपस्थित होते.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content