Homeडेली पल्स५ वर्षांत सव्वा...

५ वर्षांत सव्वा कोटींहून अधिक लोकांनी घेतले सॉफ्ट स्किल्सचे प्रशिक्षण!

राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालया अंतर्गत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सहकार्याने, प्रवासी कौशल विकास योजनेअंतर्गत (PKVY) संभाव्य स्थलांतरितांना एक दिवसीय प्री-डिपार्चर ओरिएंटेशन ट्रेनिंग (PDOT) देत आहे. स्थलांतरितांना परदेशी गंतव्यस्थानी स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आवश्यक असलेल्या सॉफ्ट स्किल्सनी सुसज्ज करणे हे या प्रशिक्षणाचे उद्दिष्ट आहे. जानेवारी 2018 पासून 31 मे 2023 पर्यंत एकूण 1,29,062 उमेदवारांनी, प्रवासी कौशल विकास योजनेअंतर्गत अंतर्गत प्री-डिपार्चर ओरिएंटेशन प्रशिक्षण घेतले आहे.

या प्रशिक्षणात भाषा, संस्कृती, स्थलांतर प्रक्रिया, कल्याणकारी उपाय आणि गंतव्य देशात काय करावे आणि करू नये अशा विविध पैलूंबाबत माहिती देण्यात येते. 8 तासांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर उमेदवाराला प्रमाणपत्र देण्यात येते.

विविध देशांमध्ये नोकऱ्या मिळालेल्या प्री-डिपार्चर ओरिएंटेशन (PDO) प्रशिक्षित व्यक्तींची आकडेवारी मंत्रालय ठेवत नाही.

कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content