Homeहेल्थ इज वेल्थमुंबईतल्या ६२ खासगी...

मुंबईतल्या ६२ खासगी रुग्णालयात लसीकरण पुन्हा सुरू!

बृहन्मुंबई महानगरपालिकेला कोविड-१९ लसचा साठा उपलब्ध झाल्याने आज म्हणजेच सोमवार, दिनांक १२ एप्रिल २०२१पासून मुंबईतील निर्देशित ७१पैकी ६२ खासगी रुग्णालयात कोविड लसीकरण पुन्हा सुरू झाले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका आणि शासन यांच्यातर्फे मुंबईत ४९ तर खासगी रुग्णालयात ७१ लसीकरण केंद्रं कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. या सर्व केंद्रांवर मिळून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात प्रतिदिन सरासरी ४० ते ५० हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात येते.

लस साठा संपल्यामुळे मुंबईतल्या ७१ खासगी रुग्णालयात, शनिवार, दिनांक १० एप्रिल २०२१ आणि रविवार, दिनांक ११ एप्रिल २०२१ असे दोन दिवस लसीकरण थांबले होते. मात्र, मुंबई महानगरपालिकेच्या तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरू होते. आता लस साठा अधिक प्रमाणावर उपलब्ध होताच खासगी रुग्णालयातही लसीकरण पुन्हा सुरू करण्यात आले आहे.

शुक्रवार, दिनांक ९ एप्रिल २०२१ रोजी रात्री उशिरा ९९ हजार लसी आणि शनिवार, दिनांक १० एप्रिल २०२१ रोजी १ लाख ३४ हजार ९७० अशा एकूण २ लाख ३३ हजार ९७० लसींच्या मात्रा मागील दोन दिवसात मुंबई महापालिकेला उपलब्ध झाल्या. त्यातून खासगी रुग्णालयात लसीकरण केंद्रासाठी लस साठा वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे आजपासून नियमित वेळेत ७१ पैकी ६२ खासगी लसीकरण केंद्रदेखील कार्यान्वित राहतील, असे महापालिकेने कळविले आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content