Homeचिट चॅटपंतप्रधान मोदींची उद्या...

पंतप्रधान मोदींची उद्या ‘परिक्षा पे चर्चा’!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परिक्षा पे चर्चा या विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधणाऱ्या विशेष कार्यक्रमाची चौथी आवृत्ती कोविड-19 नियमावलीच्या अनुषंगाने प्रथमच दूरसंवाद पद्धतीने होणार आहे.

या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण बुधवारी 7 एप्रिल 2021 रोजी संध्याकाळी 7 वाजता दूरदर्शन वाहिन्या तसेच डिजिटल माध्यमातून हिंदी व इतर प्रादेशिक भाषांमधून होईल. शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागातर्फे सलग चौथ्या वर्षी या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले जात आहे.

नववी ते बारावीतील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी 17 फेब्रुवारी ते 14 मार्च 2021 या कालावधीत https://innovateindia.mygov.in/ppc-2021/ या संकेतस्थळावर विविध विषयांवरील ऑनलाईन सृजनशील लेखन स्पर्धा घेतली होती. सृजनशील लेखन स्पर्धेत 10.5 लाख विद्यार्थी, 2.6 लाख शिक्षक व 92 हजार पालकांनी उत्साहाने भाग घेतला. भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी 60% हून जास्त विद्यार्थी नववी व दहावीचे आहेत. ‘परिक्षा पे चर्चा’ पूर्व सृजनशील लेखन स्पर्धेत प्रथमच 81 इतर देशातील विद्यार्थ्यांनी भाग घेतला.

परिक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या चौथ्या भागासाठी जवळपास 14 लाख जणांनी  नावनोंदणी केली आहे.  परिक्षा पे चर्चा हा मुख्य कार्यक्रम दूरदर्शन वाहिन्या तसेच  EduMinofIndia, narendramodi, pmoindia, pibindia, DoordarshanNational, MyGovIndia, DDNews, RajyaSabhaTV, SwayamPrabha ही डिजिटल माध्यमे त्यांच्या फेसबुक आणि युट्युब वाहिन्यांवर 7  एप्रिल 2021 रोजी संध्याकाळी 7 वाजल्यापासून प्रसारित करतील. #ExamWarriors #PPC202 हे हॅशटॅग मोठ्या प्रमाणावर समाजमाध्यमांमध्ये वापरले जात आहेत. 

परिक्षेचा उत्सव करणाऱ्या ‘परिक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमासाठी देश एकत्र येईल, ज्यामुळे देशभरातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांना पंतप्रधानांच्या उभारी देणाऱ्या शब्दांचा लाभ घेता येईल.

Continue reading

राज्यपाल आचार्य देवव्रत मुंबईत

महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्यासाठी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे आज, रविवारी मुंबईत सपत्नीक आगमन झाले. अहमदाबाद येथून तेजस एक्स्प्रेसने आलेल्या राज्यपालांचे तसेच त्यांच्या पत्नी दर्शनादेवी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल...

मुंबईत रिपब्लिकन पक्षाचा उपमहापौर!

येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीची सत्ता आल्यास रिपब्लिकन पक्षाला उपमहापौरपद निश्चित मिळेल. रिपब्लिकन पक्षाला उत्तर मुंबई जिल्ह्यात किमान 7 जागा आणि संपूर्ण मुंबईत किमान 24 जागा महायुतीने सोडाव्यात असा प्रस्ताव भारतीय जनता पार्टीकडे देण्यात यावा. त्यातील काही जागा रिपब्लिकन पक्ष...

काँग्रेसची मंत्रालयासमोरची जागा परस्पर आरबीआयच्या घशात!

काँग्रेससह विविध राजकीय पक्षांची नरीमन पाईंट भागातील कार्यालयांचे मेट्रोच्या कामासाठी सरकारच्या विनंतीवरून तात्पुरते स्थलांतर करण्यात आले होते. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचजागी काँग्रेससह सर्व कार्यालये नव्याने बांधून देण्याचे आश्वासन मेट्रो कार्पोरेशनने दिले होते. पण आता मात्र काँग्रेस पक्षाला अंधारात...
Skip to content