Homeमाय व्हॉईसउद्धवजी! कावळे मोती...

उद्धवजी! कावळे मोती खाताएत..

आमचा राग अन्य कोणावर नाही. तो फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे यांच्यावर आहे. कारण ते जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हाच मी याठिकाणी लिहून ठेवलेले आहे की, मुख्यमंत्री होणे ही उद्धव यांची सर्वात मोठी चूक ठरलेली आहे. आणि काही यापद्धतीची उदाहरणेदेखील दिली होती की उद्धव यांचे मुख्यमंत्री होणे म्हणजे एखाद्या राजाने पंतप्रधान होण्यासारखे किंवा आलीया भटने दादा भुसे यांच्या प्रेमात पडण्यासारखे किंवा एकनाथ शिंदे यांनी पैशांचा मोह सोडून संत तुकारामाच्या भूमिकेत कायम शिरण्यासारखे, मुकेश अंबानी यांनी दिवाळीला बायकोसाठी दादरच्या फुटपाथवरून, तेही घासाघीस करून साडी विकत घेण्यासारखे आहे, असे म्हटले होते.

बदमाशांच्या विशेषतः अतिभ्रष्ट मंत्र्याच्या घोळक्याचे नेतृत्त्व करणे म्हणजे सच्च्या शिवसैनिकांचे नेतृत्त्व करण्यासारखे ते सोपे नव्हते. अनिल देशमुख यांच्याचसारखे बहुसंख्य, पैसे खाण्याच्या बाबतीत ओवाळून टाकलेले, नीच आणि हलकट नेते महाआघाडीमध्ये मंत्री म्हणून, राज्यमंत्री म्हणून शपथ घेऊन मोकळे झाले होते. त्यांना व त्यांच्या समस्त नेत्यांना अननुभवी उद्धव यांचे मुख्यमंत्री म्हणजे आजवरची त्यांना व राज्यातल्या दलालांना सरकारी अधिकाऱ्यांना चालून आलेली आयती व मोठी संधी होती. आणि त्या संधीचे राज्यातल्या या समस्त बदमाषांनी, बहुसंख्य भ्रष्ट मंत्र्यांनी, राज्यमंत्र्यांनी फक्त स्वतःसाठी सोने केले, ज्यातून उद्धव आपोआप बदनाम होत गेले.

विशेष म्हणजे सेना-भाजपा युती दुभंगली तसेच शिवसेना राज्यात बऱ्यापैकी संपली आणि भाजपा संकटात सापडली. केवळ चांदी झाली ती शरद पवार यांची आणि काँग्रेसला तर राज्यात अचानक सत्तेमध्ये वाटा मिळणे म्हणजे एक तिकीट विकत घेतले असताना त्याचीही मोठी लॉटरी लागण्यासारखे.. हे त्यांच्या बाबतीत घडले होते. अत्यंत दुर्दैवी असे हे कोरोना आणि उद्धव पर्व ज्यामुळे या राज्याची आणि उद्धव यांच्या स्वतःच्या उत्तुंग नेतृत्त्वाची मोठी वाट लागलेली आहे..

उद्धव

गृहमंत्री पदावर यापुढे टिकून राहणे अनिल देशमुख यांना अजिबात शक्य नाही. आणि तसेही त्यांना या पदावर काहीही झाले तरी ठेवायचे नाही हे शरद पवार यांनी स्वतःच ठरविलेले आहे. फक्त पवारांना असे वाटते की, देशमुख यांचे केवळ खाते बदल करावेत आणि मंत्रीपद त्यांचे कायम असावे, कायम टिकावे. पण देशमुख यांच्याविरुद्ध जमा झालेले असंख्य पुरावे तसेच मीडिया व भाजपा दोघांनी देशमुख यांच्या काळ्या कृत्यांना पुरून उरणे आणि महत्त्वाचे म्हणजे राज्यातल्या जनतेला त्यांचा व पवारांचा मनस्वी, मनापासून, मनातून आलेला, असलेला राग, अत्यंत अत्यंत महत्त्वाचे म्हणजे केवळ देशमुख यांच्या काळ्या कृत्यांमुळे पोलिसांची डागाळलेली प्रतिमा, त्या तुंबट्यांच्या मनात असलेला देशमुख यांच्याविषयीच्या राग, त्यातून जरी पवारांच्या मनात असले आले तरी अनिल देशमुख यांच्याकडे गृहखाते कायम ठेवणे फार दूरचे.. पण माझा अनुभव आणि माहिती सांगते की अनिल देशमुख यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी नक्की आहे.

फक्त जर देशमुख यांचे नशीब बलवत्तर असेल तरच ते गजाआड जाणार नाहीत. अन्यथा अनिलबाबू यांना शरद पवार यांनी वाचविण्याचा प्रयत्न न केल्यास त्यांचाही अगदी सहज छगन भुजबळ होईल. अर्थात त्याकाळी छगन भुजबळ यांचे वाढलेले मोठे महत्त्व, त्यातून त्यांना तुरुंगात जावे लागले, जे पवारांच्या मनासारखे झाले किंबहुना तेच त्यांच्या मनात होते. पण येथे अनिल देशमुख म्हणजे छगन भुजबळ यांच्यासारखे प्रभावी व लोकमान्य ठरलेले नेते नाहीत. ते त्यामानाने अगदीच लिम्बुतिंबू आहेत. त्यांचे त्या काटोलपलीकडे फारसे अस्तित्त्व किंवा महत्त्व नसल्याने ते तुरुंगात जाऊन पक्षाची व पवारांची बदनामी होऊ नये, हेच आज पवार यांना नक्की वाटत असल्याने शरद पवार आपली प्रतिष्ठा नक्की पणाला लावतील.

जरी त्यांचे गृहमंत्रीपद वाचविता आले नाही तरी देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांनी जमा केलेली अमाप संपत्ती व अनिल देशमुख आणि त्यांच्या सभोवतालचे सरकारजमा होणार नाहीत, गजाआड जाणार नाहीत, तसे संकट टाळण्याचेच पवार यांचे यापुढे प्रयत्न असतील..

जसे संजीव पलांडे किंवा अन्य काही कायम मंत्रालयाजवळील पंचतारांकित हॉटेलमध्ये राहून किंवा बसून गृहखात्याचा हिसाबकिताब सांभाळायचे तसे काम नागपुरात गेली अनेक वर्षे अनिल देशमुख यांचा स्वीय सहाय्यक व उजवा हात, भामटा सांभाळत आला आहे आणि हाच देशमुख यांच्या सांगण्यावरून महिन्याकाठी नागपूर परिसरात कोट्यवधी रुपये जमा करीत असल्याचा आरोप नागपुरातील एका स्थानिक वाहिनीने केला आहे. अर्थात यापुढे दरदिवशी अशी कितीतरी पैशांची व हेराफेरीची प्रकरणे देशमुख यांची बाहेर येणार असल्याने त्यांनी त्यावर उत्तरे देण्याची मानसिकता बनवावी. अन्यथा होणारे आरोप खरे आहेत असा निकर्ष त्यातून नक्की निघेल. अर्थात असे कितीतरी गैरप्रकार, ज्यातून हे महाशय आपल्याला गृहमंत्री होते, लाभले याची सर्वांना लाज वाटावी, असे नक्की बाहेर येतील. बघूया, ही तर सुरुवात आहे..

Continue reading

पवार पॉवर पर्व संपल्यात जमा…

आजपर्यंत, आजतागायत मी याआधी कधीही ना लिहिले, ना म्हटले की पवार संपले. पण आता पुन्हा नव्याने पक्ष बांधू असे जाहीर सांगणारे पवार संपूर्ण, पूर्णतः संपल्यात जमा आहेत. पण ते कसे यापुढे राजकीयदृष्ट्या जिवंत राहतील, त्यांचे अस्तित्त्व कसे आणखी टिकून...

शरद पवारांचे राजीनामानाट्य म्हणजे शुद्ध बनवाबनवी!

लबाड संधीसाधू ढोंगी नेत्यांना कायम मांजरीच्या डोळे मिटून दूध पिण्याच्या भूमिकेचे समर्थन करायला आवडते. पण ज्यांच्या हाती मतदानरुपी काठी आहे, असते ते या राज्यातले समस्त मतदार अतिशय चाणाक्ष, चतुर आणि हुशार असतात. दुर्दैवाने हे नेत्यांच्या लक्षात येत नाही. मग...

विधान परिषदेचे सभापती कोण? रामराजे की नीलमताई??

विधानसभा भाजपाच्या ताब्यात आहे. तेथे विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई ऍडव्होकेट राहुल नार्वेकर अलीकडे अध्यक्ष झाले आहेत. विधान परिषदेचे सभापतीपद खाली आहे. विधान परिषदेच्या सभापतीचा कार्यभार उपसभापती उद्धव सेनेच्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडे असला तरी...
Skip to content