Homeकल्चर +मुंबईत उद्या 'उमगलेले...

मुंबईत उद्या ‘उमगलेले गांधी’!

मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या रंगस्वर विभागाच्या वतीने `उमगलेले गांधी’ हा अभिवाचनाचा कार्यक्रम उद्या म्हणजेच शनिवार दि. ३० जानेवारी २०२१ या दिवशी सायंकाळी साडेसहा वाजता रंगस्वर सभागृहात होणार आहे. रोहिणी हट्टंगडी, चंद्रकांत कुलकर्णी, धनश्री करमरकर, दीपक राजाध्यक्ष यांचा यात सहभाग आहे. यासाठी प्रवेश विनामूल्य आहे.

महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून होत असलेल्या या कार्यक्रमाची संकल्पना दीपक राजाध्यक्ष यांची असून उन्मेष अमृते यांनी कार्यक्रमाचे संपादन केले आहे. आविष्कार संस्थेची निर्मिती असलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रधार अरुण काकडे आहेत. रसिकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Continue reading

सप्टेंबरमध्ये येतोय फोल्डेबल आयफोन-18!

ॲपलच्या आयफोन-18 मालिकेची जगभरात प्रचंड उत्सुकता आहे. ॲपलच्या नेहमीच्या वार्षिक वेळापत्रकानुसार, आयफोन-18 Pro आणि 18 Pro Max हे दोन्ही फ्लॅगशिप फोन 3 ते 10 सप्टेंबर 2026 दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी एक मोठा बदल होणार आहे, सामान्य...

इस्रायलमधल्या ‘मिनी इंडिया’वर इराणचा हल्ला!

इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाच्या चौथ्या आठवड्यात सर्वात मोठी घटना घडली. इराणने इस्रायलच्या दक्षिणेकडील 'डिमोना' आणि 'अराड' या दोन शहरांवर क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यांमध्ये किमान १८० जण जखमी झाले. हा परिसर इस्त्रायलमधा मिनी इंडिया म्हणून ओळखला जातो. इराणने हा हल्ला इस्रायलने केलेल्या...

अवकाळी, गारपिटीमुळे उत्तर महाराष्ट्र ते विदर्भापर्यंतचे शेतकरी हवालदिल

गेल्या आठवड्यात राज्यभरात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने तब्बल २४ जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला. राज्यभरात सुमारे ५१,४८८.५४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि चक्रीवादळी प्रणालींच्या एकत्रित प्रभावामुळे हवामानात हा अचानक बदल झाला. गुढीपाडव्याच्या...
Skip to content