Homeटॉप स्टोरीमहाराष्ट्रातले २२ आमदार...

महाराष्ट्रातले २२ आमदार निघाले युरोपला!

महाराष्ट्र विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे २२ सदस्य आज युरोपच्या दौऱ्यावर रवाना होत आहेत. या सदस्यांसाठी २४ ऑगस्ट ते ०४ सप्टेंबर, २०२३ या कालावधीत जर्मनी, नेदरलँड आणि युनायटेड किंगडम, तीन युरोपीय देशांच्या अभ्यासदौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या अभ्यासदौऱ्यात सहा अभ्यासभेटी तसेच बैठका होणार आहेत. या परदेश अभ्यासदौऱ्याला परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, भारत सरकार, यांची मान्यता (Political Clearance) प्राप्त झाली आहे. अभ्यासदौऱ्यावरील सदस्यांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्त्व विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे करत आहेत. फ्रॅंन्कफर्ट (जर्मनी), ॲमस्टरडॅम (नेदरलँड) आणि लंडन (यु.के.) या शहरांना हे शिष्टमंडळ भेट देईल. एकूण २२ सदस्यांमध्ये निम्म्या संख्येने म्हणजे ११ महिला सदस्या सहभागी झाल्या आहेत, अशी माहिती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली. प्रा. मनिषा कायंदे, सीमा हिरे, मनिषा चौधरी, विद्या ठाकूर, उमा खापरे, सुमन पाटील, सुलभा खोडके, माणिकराव कोकाटे आदी सदस्यांचा या शिष्टमंडळात समावेश आहे.

राष्ट्रकुल संसदीय मंडळ मुख्यालयाला तसेच अन्य अभ्यासभेटींचे आयोजन

अभ्यासदौऱ्यात प्रारंभी फ्रॅंन्कफर्ट येथे सामाजिक, सांस्कृतिक तसेच कृषी आणि दुग्धउत्पादन क्षेत्रातील तज्ञांबरोबर तसेच भारताचे उच्चायुक्त यांच्यासमवेत बैठक होईल. त्याचप्रमाणे जर्मनीत स्त्री-पुरुष समानतेसाठी कार्य करणाऱ्या अभ्यासगटाबरोबर चर्चा-संवाद आयोजित करण्यात आली आहे.

ॲमस्टरडॅम येथे नेदरलॅंडच्या विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांबरोबर तसेच संयुक्त राष्ट्र महिला आणि हक्क समानता विचारमंच (UN Women And Gender Equality Forum) सदस्यांसोबत अभ्यासभेट, चर्चा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी भारताचे नेदरलॅंडमधील राजदूत यांचीही अभ्यासभेटीवरील सदस्य भेट घेतील. त्याचप्रमाणे लंडन येथेदेखील भारताचे लंडनमधील उच्चायुक्त, संयुक्त राष्ट्र महिला आणि हक्क समानता विचारमंच, लंडन, (UN Women Organisation And Gender Equality Forum in United Kingdom), लंडनमधील मराठी मंडळाचे पदाधिकारी, यु.के. पार्लमेंटमधील राष्ट्रकुल संसदीय मंडळ मुख्यालय  आणि महासचिव (Secretary-General, CPA Headquarters) यांच्यासमवेतदेखील अभ्यासभेट आयोजित करण्यात आली आहे, असे त्या म्हणाल्या.

Continue reading

एलिमेंट्स आर्ट क्लासेसचे अप्रतिम प्रदर्शन

एलिमेंट्स आर्ट क्लासेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी येथे पंचतत्व या तीन दिवसांचे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा ते १८ वर्षे वयोगटातल्या जवळजवळ ४५ विद्यार्थ्यांच्या सुमारे ९० कलाकृती या प्रदर्शनात...

अकरावी प्रवेशासाठी नंतर सादर करा गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला

राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...
Skip to content