HomeArchiveघटमांडणी, सट्टा बाजार...

घटमांडणी, सट्टा बाजार नि सत्तामांडणी..

Details
“घटमांडणी, सट्टा बाजार नि सत्तामांडणी..”

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
देशभरात आगामी सत्ता कोणाची यावरून बरीच चर्चा ‘जळी स्थळी काष्ठी पाषाणी’ म्हणावी तशी रंगली आहे. निकालाची तारीख जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसं याला उधाण येत आहे. तर्कवितर्क, अंदाज, वगैरे पुढील बराच काळ चालू राहणार. मात्र, बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळची घटमांडणी, सट्टाबाजार यांनी आधीच अनुमान लावत ‘नमो’ कौल दिला आहे. त्यादृष्टीने भाजपने ‘सत्ता मांडणी’च्या हालचाली सुर केल्या आहेत. बहुमताचा ‘जादुई आकडा’ कमी पडल्यास गेल्या काळातील घटक पक्षांसह नवे कोणी नि किती येतील याची चाचपणी पूर्ण झाली आहे. भाजप बहुमताचे सरकार स्थापन करेल असा विश्वास शीर्षस्थ नेत्यांना, ज्योतिषांना वाटत असला तरी बेसावध राहून अंगलट येणारी खेळी नको, असे प्रयत्न सुरू आहेत. कागदावरची गणितं मांडली जात आहेत.

सट्टाबाजारात राजस्थानच्या फलोदीचे स्थान वेगळं असल्याचं म्हंटलं जातं. प बंगालच्या मतदानानंतर सट्टाबाजारात अचानक उसळी आली. भाजपचा भाव पुन्हा वाढला तर काँग्रेसचा स्थिर असलेला भाव झपाट्याने खाली पडला. बंगालचे निकाल धक्कादायक असतील असं सांगत सटोडियांनी दोन विभागात सट्टा लावलाय. त्यांच्या मते चांगल्या मतदानामुळे ‘ममता पार्टी’च्या जागा कमी होतील. तर काहींनी हा केंद्र सरकारच्या विरोधातील आक्रोशाचा परिणाम ठरवला आहे असं सांगत जादा पैसा लावलाय.

फलोदी बाजारानुसार हे जास्तीचं मतदान म्हणजे भाजपची पुर्वानुमानीत २७० जागांवरून ३००हून जास्तीच्या जागांची झेप तर सुरतच्या सट्टाबाजारानुसार उ. प्र., म. प्र.मध्ये भाजपला मोठा फटका बसणार आहे. यातून रालोआला २३५ जागांवर समाधान मानावे लागेल. या फलोदी बाजाराने पाचव्या टप्यापर्यंत रालोआला २७० ते २८० जागा दिल्या होत्या तर आता ३०० चा अंदाज वर्तवला आहे. सुरत बाजाराने सहावा टप्पा झाल्यावरही २३५ ते२४५ जागा मिळतील असं म्हंटलंय. दिल्लीचा सट्टाबाजार मात्र सायंकाळनंतर भाजपला फायदा होईल म्हणत पैसा काढून घेताना दिसला. भाजपला सातपैकी सहा तर काँग्रेसच्या वाट्याला एक जागा देऊ केलीय. चार वाजेपर्यंत इथे भाजपला २७ पैसे तर काँग्रेसला १७ पैसे नि आपला ३ पैसे भाव होता. पुढे यात बदल होत, भाजपला पूर्ण पसंती दर्शवत, काँग्रेसला १३ पैसे देत आपवर कोणी बोलीदेखील लावली नाही.

असं सांगितलं जातं की ही लोकसभेची पहिली निवडणूक आहे, ज्यात भाजपनंतर प्रादेशिक पक्षांवर जास्त भाव लावला जात आहे. काँग्रेसला मात्र त्यानंतरची पसंती आहे. काँग्रेसच्या जागा शंभरपर्यंत जातील पण त्यापुढे किती यावर भाव खेळला जात नाही. दिल्लीत मतदान संपल्यावर सर्व सात जागा भाजपला मिळतील असं सांगत नुकसान सोसत आपला पैसा सटोड्यानी काढून घेतला. पूर्ण मतदानाआधी पक्षावर लावलेला पैसा काढून घेण्याची बहुधा पहिली वेळ असावी असं फलोदी बाजाराचं म्हणणं आहे. यावरून आप दिल्लीत तोंडावर आपटली असं निरीक्षकाना वाटतं.

राजस्थानच्या फलोदी सट्टाबाजाराला आशिया खंडात वेगळा दर्जा आहे. पाचव्या टप्प्यातील अंदाजानुसार भाजपला २४०-२४५ तर एकूण रालोआला मिळून ३२०-३२५ जागा मिळतील. येथील विधानसभा निवडणुकीत त्याची भविष्यवाणी जवळपास बरोबर ठरली होती. राजस्थानात भाजपला २१-२२ तर काँग्रेसला ३-४ जागा मिळतील. जोधपुरात भाजपाचे गजेंद्र सिंह, बिकानेरमधून अर्जुन मेघवाल, नागौर येथून लोजपाचे हनुमान बेनिवाल तर बाडमेरमधून काँग्रेसचे मानवेंद्र सिंह जिकंतील असे सांगितले जाते. या चार जागा येथील ‘हॉट’ मानल्या जातात.
घटमांडणी

यंदा ७ मे रोजी अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळची घटमांडणी काय सांगते ते जाहीर झालं. त्यानुसार मोदी सत्तास्थानी कायम राहणार आहेत. यावरून मोदींना हटवायला देव पाण्यात घालून बसलेल्याचे देव पाण्यातच राहणार हे स्पष्ट झालंय. राजा बदलणार असं भाकीत २०१४ च्या निवडणुकीत आलं होतं. त्यावेळी अक्षयतृतीया दोन मे रोजी तर निकाल १६ मे रोजी लागणार होते. ते भाकीत होतं राजा बदलणार, त्यावरील. देशावरील संकटं कायम राहणार तेही आपण अनुभवलं. उरी, अलीकडचा पुलवामा हल्ला २०१४ चा काश्मीर पूर, त्यानंतर सातत्याने लष्करावर होणारे हल्ले, नोटबंदी, त्यातून निर्माण झालेली आर्थिक मंदी, २०१८ चा केरळचा महापूर, देशभरात दुष्काळी परिस्थिती, पुरस्कार वापसी, जेएनयु वाद, देश छोडो, येमुला नि उ. प्र.तील गोमांस प्रकरण, राफेल भ्रष्टाचार, अशा या ना त्या कारणाने वादविवाद, तंटेबखेडे होतंच राहिले. देशातील वातावरण ढवळून निघालं.

भेंडवळची भाकिते अंधश्रद्धा म्हणणारे यावर कधी बोलणार? जे सांगितलं जातं, तसं काही प्रमाणात तरी होतं हे समोर आलं आहे. याला नेमकं काय म्हणणार? विज्ञानदेखील चुकतंय हेही आपण पाहतो. तर काही प्रमाणात इथे भाकिते चुकतात. यावरून सगळंच खोटं ठरवण्यात काय हशील? ही तर ३५० वर्षांची परंपरा!

कोण येणार भाजपबरोबर?

भाजपचे काही नेते नि मित्रपक्षदेखील अंदाज वर्तवताना दिसतात की यावेळी पूर्ण बहुमताचा ‘जादुई आकडा’ भाजप गाठू शकणार नाही. सुब्रमण्यम स्वामी, राम माधव, संजय राऊत आदींनी असं भाकीत केलंय तर अशा स्थितीत कोण येणार भाजपाबरोबर? यावेळी भाजपाने उ. प्र., बिहार, पंजाब, महाराष्ट्र, तमिळनाडू यासह पूर्वोत्तर राज्यात मित्रपक्षांसह तर इतर राज्यात स्वबळावर निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. २०१४ च्या निवडणुकीत २७ पक्षांना घेऊन लढणाऱ्या भाजपाने २८२ तर ३३६ जागा रालोआने मिळवल्या. पुढे टीडीपी, आरएलएसपी हे दोन वेगळे झाले.

यावेळी स्थिती निराळी असून वेगवेगळ्या राज्यात विरोधी पक्ष भाजपसमोर आव्हान ठेऊन आहे. काँग्रेसनेही मागच्यापेक्षा आपली स्थिती मजबूत केलीय. त्यामुळे बहुमत न मिळाल्यास काँग्रेसविरोधातील कोण आपल्याकडं येईल याची चाचपणी झालीय. आंध्रमधील जगन मोहन रेड्डींच्या वाय. एस. आर. काँग्रेसवर लक्ष आहे. हा पक्ष यंदा चांगली कामगिरी करेल असं मानलं जातं. विशेष राज्याचा दर्जा ही मागणी पूर्ण करणाऱ्यास समर्थन देण्याचं त्यांनी जाहीर केलंय. काँग्रेससमवेत असलेला विवाद पाहता भाजपला इथे आशा आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर याकडे पाहून भाजपा डोळा मारण्याची शक्यता आहे. गेल्या पाच वर्षांत मोदी सरकारला मदत करताना महत्त्वाच्या निवडणुकीत रालोआला त्यांनी मदत केलीय. काँग्रेस हा शत्रू असून सरकारमध्ये सामील न होता त्यांचा बाहेरून पाठिंबा मिळू शकतो.

ओडिशातील नवीन पटनायक यांची ‘बीजेडी’ वेळोवेळी या सरकारसह दिसली आहे. काँग्रेसशी असलेला ‘छत्तीस’चा आकडा पाहता त्यांचा पाठिंबा मिळू शकेल. पण, भाजपाने तीव्रतेने इथे निवडणूक लढली आहे हे पाहता मैत्रीची शक्यता धूसर दिसत आहे. मोदींचे मंत्री म्हणून काम केलेले बिहारमधील उपेंद्र कुशवाह महागठबांधनात असले तरी कामी येऊ शकतील. तेथील मुकेश साहनी, जीतनराम मांझी, हरियाणातील ओमप्रकाश चौटाला यांची ईनेलो यासाठीही प्रयत्न होतील. एकूणच बहुमत न मिळाल्यास भाजपाकडून मिळणाऱ्या खिरापतीवर वरच्या पक्षप्रमुखांच लक्ष असेल नि हाकेला ‘ओ’ देतील असं म्हंटलं जातं. पाहू.. घोडामैदान जवळ येतंय. कळेलच काय होईल ते! तोपर्यंत चर्चा करा, अंदाज सांगत राहा.. आपलं काम संपलं, लोकशाही जगेलंच!”
 
“विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार

Continue reading

‘माझ्या सोन्या’तली अभिनेत्री ऐश्वर्या नक्की आहे तरी कोण?

मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीत वेगाने आपली ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री, निर्माती आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर ऐश्वर्या हरिशंकर सध्या चांगल्याच चर्चेत आहे. अमेरिकेतील डेट्रॉईट (मिशिगन) येथे जन्मलेल्या आणि पुण्यात वाढलेल्या ऐश्वर्याने अवघ्या २१व्या वर्षी अभिनय, चित्रपट निर्मिती आणि सोशल मीडिया...

शिक्षणाचे माहेरघर पुणे ठरले ‘नीट’ पेपरफुटीमागचे मुख्य केंद्र!

वैद्यकीय प्रवेश अर्थात 'नीट' परीक्षेचा पेपर छापखान्यातून फुटला नव्हता. उलट नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच 'एनटीए'च्याच मंडळींनी नीट पेपर फोडण्याचा उद्योग केला आहे. गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय)ने विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात हा खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे. 'एनटीए'च्या विषय...

युपीआय आणि रुपे व्यवहारांवरच्या शुल्कामागे अमेरिकेचा दबाव?

युपीआय आणि रुपे कार्डद्वारे होणाऱ्या व्यवहारांवर लवकरच 'मर्चंट डिस्काउंट रेट' (एमडीआर) म्हणजेच शुल्क लागू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने नुकतेच संसदेत 'टॅक्सेशन अँड अदर लॉज (अमेंडमेंट) बिल २०२६' मंजूर केले आहे. यामुळे, सध्याच्या 'झीरो-एमडीआर' (मोफत व्यवहार) धोरणात...
Skip to content