Wednesday, January 15, 2025
Homeब्लॅक अँड व्हाईटमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान...

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या लेखी परीक्षा शनिवारपासून

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र 2024मधील दुसऱ्या टप्प्यातील लेखी परीक्षांना शनिवार, 22 जून 2024पासून प्रारंभ होत आहे. या परीक्षेसाठी राज्यातील सुमारे 82,267 विद्यार्थी बसणार असल्याचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी स्पष्ट केले.

विद्यापीठाच्या विविध पदवी, पदव्यूत्तर व विद्यापीठ संचलित अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा राज्यातील एकूण 207 परीक्षा केंद्रावर संचलीत होणार आहे. या परीक्षेत बी.डी.एस, बी.ए.एम.एस., बी.यु.एम.एस., बी.एच.एम.एस. उर्वरित पदवी अभ्यासक्रमाच्या तसेच बी.एस्सी. नर्सिंग, बेसिक बी.एस्सी. नर्सिंग, पी.बी. बी.एस्सी. नर्सिंग, बी.पी.टी.एच. बी.ओ.टी.एच. बी.पी.ओ. बी.ए.एस.एल.पी., उर्वरित पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या एम.डी.एस., डिप्लोमा डेन्टींस्ट्री, एम.डी.-एम.एस. आयुर्वेद अॅण्ड युनानी, डिप्लोमा आयुर्वेद, एम.डी. होमिओपॅथी, एम.ओ.टी.एच., एम.एस्सी. नर्सिंग, एम.पी.टी.एच., एम.पी.टी., एम.ए.एस.एल.पी., एम.एस्सी. (ऑडिओलॉजी), एम.एस्सी., (एस.एल.पी.), एम.पी.ओ. परीक्षा घेण्यात येणार आहेत.

विद्यापीठ संचलित अभ्यासक्रमात एम.पी.एच., एम.पी.एच (एन), एम.बी.ए., एम. फिल., बी. ऑप्टोमेट्री, डिप्लोमा ऑप्टोमेट्री, / ऑप्थॉलमिक, डिप्लोमा पॅरामेडिकल, सी.सी.एम.पी., एम.एम.एस.पी.सी., पी.जी. डि.एम.एल.टी., बी.पी.एम.टी., एम.एस्सी. फार्मास्युटिकल अभ्यासक्रमाच्या परीक्षा विद्यापीठाचे  www.muhs.ac.in अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार घेण्यात येणार आहेत.

Continue reading

नव्या दमाच्या कलाकारांचा नवा कोरा चित्रपट ‘गौरीशंकर’!

"गौरीशंकर" चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आजवर चित्रपटांतून प्रतिशोधाच्या वेगवेगळ्या कथा मांडल्या गेल्या आहेत. आता 'गौरीशंकर' या आगामी चित्रपटातून प्रतिशोधाची नवी कथा उलगडणार आहे. नव्या दमाचे कलाकार असलेला हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकतेच या...

५वी अजित घोष स्मृती महिला टी-२० क्रिकेट स्पर्धा आजपासून

मुंबईतल्या स्पोर्टिंग युनियन क्लब आणि कल्याणदास मेमोरियल स्पोर्ट्स फौंडेशनच्या विद्यमाने होणाऱ्या ५व्या अजित घोष स्मृती महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेला आज, १३ जानेवारीपासून प्रारंभ होत असून १७ जानेवारीला अंतिम लढत होऊन स्पर्धेची सांगता होईल. गतविजेते डॅशिंग स्पोर्ट्स क्लब यांच्यासह ८...

कडाक्याच्या थंडीतही शनिवारी विजेची विक्रमी मागणी

थंडीमुळे हिवाळ्यात विजेची मागणी कमी होत असली तरी यंदा गेल्या शनिवारी, ११ जानेवारीला राज्यात २५,८०८ मेगावॅट इतकी आतापर्यंतच्या विक्रमी विजेची मागणी नोंदविली गेली. मात्र, ग्राहकांची ही मागणी कोणतीही अतिरिक्त वीजखरेदी न करता पूर्ण केली, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा...
Skip to content