Homeचिट चॅटपैलवान वसंतराव पाटील...

पैलवान वसंतराव पाटील कोल्हापुरात सन्मानित

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सौजन्याने, मीरा-भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाडा भाईंदरचे वस्ताद वसंतराव पाटील यांना “भारत गौरव सन्मान राष्ट्रीय पुरस्कार २०२४” पुरस्कार स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून नुकताच  प्रदान करण्यात आला.

कुस्ती क्षेत्रात अनेक वर्षांपासून केलेल्या कार्याबद्दल भारत गौरव सन्मान समारोह समिती दिल्ली, यांच्याकडून हा पुरस्कार राजेंद्र पाटील – कारगिल युद्ध, भारतीय सेना,  संजय पाटील – राज्य सचिव, शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना, संजय मालवेकर – सेवानिवृत्त भारतीय सेना दल, डॉ. स्मिता गिरी यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

हा कार्यक्रम कोल्हापूर इंजीनियरिंग असोसिएशन राणा समिती सभागृह, उद्धमनगर, कोल्हापूर येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे आयोजन अनिल माळवी (सचिव ऑर्गनायझिंग कमिटी) यांनी केले होते. यावेळी  देशभक्तीपर गीतांचा सुंदर कार्यक्रमदेखील सादर करण्यात आला.

Continue reading

असे आहे नवरात्रीचे शास्त्र!

कालपासून, सोमवारपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात झाली आहे. नवरात्रात घटस्थापना करतात. घटरूपी ब्रह्मांडात अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे म्हणजेच श्री दुर्गादेवीचे अखंड तेवणार्‍या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे. नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी...

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...
Skip to content