Homeमाय व्हॉईस'विकासाचे वारकरी' फक्त...

‘विकासाचे वारकरी’ फक्त टाळ कुटत बसणार का?

मुंबई-गोवा महामार्गाबाबत आजपर्यंत बरंच बोललं आणि लिहिलं गेलेले आहे. काही दिवसांपूर्वी काही कामानिमित्त गुहागर येथे जाण्याचा योग आला होता. गुहागरला जातानाही रायगड जिल्ह्यातील या रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे त्रास झालाच. ठाणे मुक्कामी परतत असताना रायगड जिल्ह्याच्या रोहा तालुक्यातील आंबेवाडी नाका परिसरात रस्ता रुंदीकरणासाठी अधिग्रहित केलेल्या रस्त्यांची जागा अजूनही केवळ आखणी करूनच थांबलेली दिसली. तब्बल सात-आठ वर्षे ती तशीच दिसत आहे! याला जर विकास म्हणायचे असेल तर मग प्रश्नच मिटला!!

विशेष म्हणजे महामार्गांवर जागोजागी राष्ट्रवादीचे लोकसभा उमेदवार सुनील तटकरे यांचे ‘विकासाचा वारकरी’ असे फलक लागलेले दिसले. आणि खेदाची बाब म्हणजे रोहे तालुक्यातील हा परिसर म्हणजे तटकरे यांचे ‘होम पीच’ असूनही या रस्त्याचा ‘विकास’ अजून का रखडला आहे हे समजणे अनाकलनीय आहे. कारण गेली पाच वर्षे स्वतः साहेब खासदार आणि कन्या सुमारे अडीच वर्षे पालकमंत्री होत्या. इतके दीर्घकाळ सत्तेत असूनही विकास होत नसेल तर विकासाच्या नावाने टाळ कुटणे आता कुणालाही आवडणारे नाही असे स्थानिक जनतेचे म्हणणे आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचे बांधकाम सुमारे 17/18 वर्षे रखडलेले आहे. शिवाय प्रत्येक दीड-दोन किलोमीटरनंतर परिवर्तन मार्ग असतात. या अनोख्या परिवर्तनामुळे प्रवाशांना मात्र नको तेथे त्रास सहन करावा लागतो. इतकेच नव्हे तर रायगड जिल्ह्यात या रखडलेल्या कामामुळे रसत्याची पार धुळधाण झालेली आहे. परिणामी या जिल्ह्यात सुमारे दोन हजार जर्क्सना सामोरे जावे लागते. कंबर अक्षरशः ठेचून निघते. ज्येष्ठ तसेच युवकांना मुक्कामी पोहोचल्यानंतर ‘अस्थीव्यँग डॉक्टर’कडे जाऊन आपली कंबर व शरीर ठीक करून घ्यावे लागते. यावर सर्वच रुग्णालयात मोफत उपचार केले जावेत अशीही नागरिकांची मागणी आहे.

गुहागरच्या भेटीत अजून एक संतापजनक माहिती हाती आली व ती म्हणजे हे विकासाचे वारकरी म्हणवणारे नेते गेल्या पाच वर्षांत पाच वेळाही गुहागरला गेलेले नाहीत. गुहागरचा काही पट्टा रायगड लोकसभा मतदारसंघाला जोडलेला आहे. दरम्यान केंद्र सरकारच्या या सर्व योजनाना केंद्र सरकार निधी पुरवते. मात्र त्यासाठी राज्य सरकारची केवळ स्वाक्षरी पुरते. असे असतानाही राज्य मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री व त्यांचे सहाय्यक संबंधित कंपन्यांकडे निवडणूक निधीपोटी कोट्यवधी रुपयांच्या निधीची मागणी करतात, अशी कुजबूज मंत्रालय परिसरात उघडउघड केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

विकास

सूत्रांनी दिलेल्या या माहितीत जराही अतिशयोक्ती नाही. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील मागील सरकार ‘कमिशन’ सरकार होते असे एका जाहीर सभेत सांगितले होते. आता या निवडणूक निधी मागणाऱ्या प्रवृत्तीला ‘कमिशन’ म्हणणार की अजून काही वेगळा शब्द ‘कॉइन’ करणार हे येणारा काळचं ठरवेल!!

छायाचित्र मांडणी- श्रेया साळसकर, प्रवीण वराडकर

Continue reading

ठाण्यात चाललाय बिनपैशाचा राजकीय ‘तमाशा’!

गेले दीड-दोन महिने ठाणे शहर आणि ठाणे पोलीस आयुक्तालायाच्या परिक्षेत्रात वाटेल तिथे उभ्या असलेल्या गाड्या खेचून (टोईंग) नेण्यावरून बिनकामाचे आंदोलन सुरु आहे. आश्चर्य म्हणजे या आंदोलनात सत्तारूढ राजकीय पक्षच आघाडीवर दिसत आहे. खरेतर या सर्व राजकीय पक्षांनी आंदोलनाच्या फंदात...

सायनला मुंबईच्या दोन्ही पालकमंत्र्यांनी चालून दाखवावेच!

"मुकी बिचारी कुणीही आणि 'कशीही' हाका..." मुंबईच्या शीव (सायन) येथील जुना पूल पाडून नवीन पुलाचे बांधकाम सुरु झाले आहे. हा पूल पाडण्याआधी जनतेला त्रास होईल, वाहतुकीचे काय होईल आदी अनेक प्रश्न घेऊन सर्वच राजकीय पक्षांनी एकच कल्ला केला होता,...

मुंब्रा अपघातानंतर अभियांत्रिकी ज्ञान पाजळायचे कारण काय?

एप्रिल महिन्याच्या मध्यास इथेच आम्ही 'काही सेकंदात' दुसरी लोकल गाडी धावणार, या रेल्वेमंत्र्यांच्या घोषणेवर टीका केली हॊती. तीच गत सध्या मुंब्रा रेल्वेस्थानकादरम्यान घडलेल्या दुर्दैवी अपघातासंदर्भात सरकार, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते पुन्हा करत असल्याचे दुर्दैवाने म्हणावे लागत आहे. एका वळणावर...
Skip to content