Homeब्लॅक अँड व्हाईटमुंबई शिक्षक मतदारसंघ...

मुंबई शिक्षक मतदारसंघ काँग्रेस लढवणार?

मुंबई शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसने प्रा. प्रकाश सोनवणे याची उमेदवारी जाहीर करावी या मागणीसाठी माजी खासदार हुसेन दलवाई यांनी काल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस व प्रदेश कॉंग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांची प्रदेश कार्यालय, टिळकभवन येथे भेट घेतली. मुंबई शिक्षक मतदारसंघाकडे काँग्रेस सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याने मुंबईत काँग्रेसचे अतोनात नुकसान होत आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात काँग्रेसला मानणारा शिक्षकवर्ग असूनही काँग्रेसकडून सातत्याने मुंबई शिक्षक मतदारसंघ न लढवता दुसऱ्या पक्षाला दिला जातो. यावेळी मात्र हा मतदारसंघ काँग्रेसनेच लढवावा, अशी विनंतीही त्यांनी केली.

मुंबई शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसच्या शिक्षक आघाडीचे प्रमुख प्रा. प्रकाश सोनवणे यांना यावेळी उमेदवारी देणे योग्य राहील. प्रा. सोनवणे गेल्या चाळीस वर्षांपासून मुंबईत शिक्षक संघटनेत काम करीत आहेत तसेच त्यांनी मोठ्या प्रमाणात शिक्षक मतदारसंघातून शिक्षकांची उमेदवारी नोंदवलेली आहे. प्रा. सोनवणे मुंबई कनिष्ठ महाविद्यालय संघटनेचे संस्थापक सदस्य असून महाराष्ट्रातील विनाअनुदानित

शिक्षकांना त्यांनी मोठ्या प्रमाणात न्याय मिळवून दिला आहे हे महाराष्ट्रातील सर्व शिक्षकवर्ग जाणतो. मुंबईतील डाव्या विचारसरणीच्या शिक्षक संघटनाही प्रा. प्रकाश सोनवणे यांच्या पाठीशी उभ्या राहणार आहेत. या सर्व जमेच्या बाजू धरता काँग्रेसच्या माध्यमातून सोनवणे नक्कीच निवडून येतील याची मुंबईतील शिक्षकांना खात्री आहे असे त्यांनी चेन्निथला यांना सांगितले.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व  महाआघाडीच्या नेत्यांशी चर्चा करून प्रा. सोनवणे यांची उमेदवारी जाहीर करण्यात येईल असे आश्वासन चेन्निथला यांनी दलवाई यांना दिले. यावेळी कनिष्ठ महाविद्यालय संघटनेचे नेते मुकुंद आंधळकर, माजी आमदार हुस्नबानो खलिफे, राजन भोसले  शिक्षक नेते प्रकाश तायडे, मधु मोहिते, शरद कदम आदी उपस्थित होते.

Continue reading

श्रीवर्धनमधले ठाकरेंचे माजी आमदार तुकाराम सुर्वेंच्या हाती घड्याळ

श्रीवर्धनमधील शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी आमदार तुकाराम सुर्वेंनी आज मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १६ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सुर्वे तुम्ही माझ्यासोबत येत आहात. हा आज माझ्या आयुष्यातील सुवर्णयोग आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल...

AIमुळे साखरेच्या उताऱ्यात 20% तर ऊस उत्पादनात 30% वाढ!

AI तंत्रज्ञानामुळे ऊस उत्पादनात 30% वाढ आणि साखरेच्या उताऱ्यात 20% वाढ यशस्वीपणे साधता आली आहे. शिवाय, पीकवाढीचा कालावधी 6 महिने कमी झाला आहे. बारामती कृषी विज्ञान केंद्र आणि ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या प्रक्षेत्रावर हा AI आधारित ऊस शेतीचा प्रयोग करण्यात...

आयातुल्लाह खामेनेईंची होणार सद्दामसारखी अवस्था?

इराण आणि इस्रायल संघर्षात आता अमेरिकेने उडी घेतली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमाध्यमावर एक पोस्ट करत म्हटले आहे की, इराणने बिनशर्त शरणागती पत्करावी. इराणच्या आकाशावर आमचे नियंत्रण आहे. इराणचे सर्वेसर्वा कुठे आहेत हे आम्हाला ठाऊक आहे. आम्हाला...
Skip to content