Homeमुंबई स्पेशलवांद्रे-धारावी परिसरात गुरूवारी...

वांद्रे-धारावी परिसरात गुरूवारी पाणीपुरवठा विस्कळीत

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जी/उत्तर विभागातील धारावी नवरंग कम्पाउंड येथे २४०० मिलीमीटर व्यासाची अप्पर वैतरणा प्रमुख जलवाहिनी व ४५० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी यांच्या जलजोडणीचे काम येत्या गुरुवारी, १८ एप्रिललला सकाळी १० वाजल्यापासून सुरू होणार असून ते शुक्रवारी, १९ एप्रिलला पहाटे ४ वाजेपर्यंत (एकूण १८ तासांसाठी) चालणार आहे. त्यामुळे या कालावधीत मुंबईतल्या काही भागांत १०० टक्के तर काही भागांत २५ टक्के पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

याचा तपशील पुढीलप्रमाणे-

पूर्णपणे पाणीपुरवठा बंद असलेला भाग:

१. एच पूर्व विभाग- वांद्रे रेल्वे टर्मिनस व वांद्रे स्थानक परिसर (गुरुवार, १८ एप्रिल व शुक्रवार, १९ एप्रिल)

२. जी उत्तर– धारावी लूप मार्ग, नाईक नगर, प्रेम नगर (गुरुवार, १८ एप्रिलला धारावी येथील सकाळचा पाणीपुरवठा)

३. जी उत्तर– धारावी लूप मार्ग, गणेश मंदीर मार्ग, दिलीप कदम मार्ग, माहीम फाटक मार्ग (गुरुवार, १८ एप्रिलला धारावी येथील सायंकाळचा पाणीपुरवठा)

२५ टक्के पाणीपुरवठा बंद असलेला भाग:

१. जी उत्तर– ६०’ रोड, शीव-माहीम लिंक रोड, ९०’ रोड, महात्मा गांधी मार्ग, संत कक्कया मार्ग, ए. के. जी. नगर, एम. पी. नगर (गुरुवार, १८ एप्रिलला धारावी येथील सकाळचा पाणीपुरवठा)

तरी या भागांमधील नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन मुंबई महापालिकेद्वारे करण्यात आले आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content