Homeमुंबई स्पेशलउद्यापासून शुक्रवार सकाळपर्यंत...

उद्यापासून शुक्रवार सकाळपर्यंत मुंबईतल्या काही भागात पाणीकपात

मुंबई महापालिकेच्या पांजरापूर संकुलातील मुंबई ३ अ उदंचन केंद्रामध्ये ९०० मिलीमीटर व्यासाची झडप बसविण्याच्या कामकाजासाठी गुरुवार २६ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून शुक्रवार, २७ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत असे एकूण २४ तासांकरीता सदर उदंचन केंद्र बंद राहणार आहे. या कारणाने पश्चिम उपनगरे, शहर भागातील एफ/दक्षिण व एफ/उत्तर वगळून सर्व विभाग तर पूर्व उपनगरातील एल व एन विभागात होणाऱ्या पाणीपुरवठ्यात १० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.

मुंबई शहर, पश्चिम उपनगरे व पूर्व उपनगरातील काही विभागांचा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून पालिकेतर्फे पिसे पांजरापूर संकुलातील पांजरापूर येथील मुंबई ३ अ उदंचन केंद्रामध्ये ८० दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचा एक नवीन उदंचन संच बसविण्यात येणार आहे. हा उदंचन संच बसविण्यापूर्वी ९०० मिलीमिटर व्यासाची एक नवीन झडप बसविण्यात येणार आहे. त्यामुळे पांजरापूर येथील मुंबई ३ अ उदंचन केंद्र गुरुवार, २६ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून शुक्रवार, २७ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत असे एकूण २४ तासांकरीता बंद ठेवण्यात येणार आहे.

परिणामी भांडुप संकुलास होणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये सुमारे १० टक्के पाणीकपात होईल. या कारणाने, उपरोक्त कालावधीत भांडुप संकुलद्वारे होणाऱया पश्चिम उपनगरे तसेच शहर भागातील एफ/दक्षिण व एफ/उत्तर वगळून सर्व विभाग तर पूर्व उपनगरातील एल व एन विभागात होणाऱ्या पाणीपुरवठ्यात १० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.

या कालावधीतील पाणीकपातीपूर्वी पाण्याचा आवश्यक तितका साठा करुन ठेवावा. तसेच, पाणीकपातीच्या काळात काटकसरीने पाणी वापरुन पालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content